घोषणा
◼ साहित्य सादरता ऑगस्ट: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूनंतर आपले काय होते (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? हे प्रकाशन दिल्यावर शक्य असेल तर पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न प्रचारकांनी करावा. बायबल अभ्यासामुळे घरमालकाचा फायदा कसा होईल हे समजावून सांगण्याकरता थोडक्यात एक प्रात्यक्षिक दाखवा. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. घरमालक आवड दाखवतो तेव्हा जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका देऊन त्यावर चर्चा करू शकता. घरमालकांकडे ही पत्रिका असेल तर बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर: बायबल नेमके काय शिकवते. जर घरमालकाकडे हे पुस्तक आधीच असल्यास, ज्या पुस्तकांची पाने पिवळी पडत आहेत अशी १९२ पानी पुस्तके किंवा १९९५ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही पुस्तक सादर केले जाऊ शकते.
◼ संपूर्ण जगभरात २००९ चे प्रांतीय व आंतरराष्ट्रीय अधिवेशनाची जाहिरात करण्यासाठी सर्वच जण मेहनत करणार आहेत. यासंदर्भात प्रचारकांना आपल्या क्षेत्रात एका खास हस्तपत्रिकेचे वाटप करायची संधी मिळेल. मंडळीला नेमलेल्या अधिवेशनाच्या तीन आठवड्याआधी ही मोहीम राबवली जाईल.
◼ मंडळीद्वारे प्रचारकांना बॅचकार्ड पाठवले जातील. आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला येणाऱ्या पाहुण्यांचे देखील हेच बॅचकार्ड असेल.