वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०९ पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००९
आमची राज्य सेवा—२००९
km ४/०९ पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

एप्रिल २७, २००९ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मार्च २ ते एप्रिल २७, २००९ पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.

१. आपली सदसद्विवेकबुद्धी प्रशिक्षित करण्याबाबत व त्यास प्रतिसाद देण्याबाबत योसेफाच्या अहवालावरून काय शिकता येईल? (उत्प. ३९:७-१२) [w०७-MR ११/१ पृ. १० परि. १६]

२. आपल्याविरुद्ध पाप करणाऱ्‍याला क्षमा करण्याच्या बाबतीत योसेफाने एक उत्तम उदाहरण कसे मांडले? (उत्प. ४५:४, ५) [w९९-MR १/१ पृ. ३१ परि. २-३]

३. “राजवेत्र” आणि “राजदंड” यांचा काय अर्थ होतो? (उत्प. ४९:१०) [w०४-MR १/१५ पृ. २९]

४. “तुम्ही माझ्या अस्थि येथून घेऊन जा,” या योसेफाच्या बोलण्याचा काय परिणाम झाला? (उत्प. ५०:२५) [w०७-MR ६/१ पृ. २८ परि. १०]

५. आपल्याला एखादी कठीण कामगिरी मिळते तेव्हा कोणती गोष्ट आपल्याला ती कामगिरी पूर्ण करण्याचा आत्मविश्‍वास देऊ शकेल? (निर्ग. ४:१०, १३) [w०४-MR ३/१५ पृ. २५ परि. ४]

६. फारोशी यहोवाने ज्या प्रकारे व्यवहार केला त्यामुळे कोणाला फायदा झाला आणि या घटनांचा आपल्यावर कसा परिणाम व्हावा? (निर्ग. ९:१३-१६) [w०५-MR ६/१ पृ. १४ परि. ८]

७. निर्गम १४:३०, ३१ या वचनांचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो? [w०४-MR ३/१५ पृ. २६ परि. ५]

८. कुरकुर करण्याचे धोके काय आहेत हे निर्गम १६:१-३ वरून कसे दिसते? [w०६-MR ८/१ पृ. ७ परि. ४, ५]

९. निर्गम १९:५, ६ मध्ये, नियमशास्त्रात दिलेल्या अटींच्या अनुषंगाने, इस्राएल राष्ट्र हे कितपत, “याजकराज्य, पवित्र राष्ट्र” होते? [w९५-MR ७/१ पृ. १६ परि. ८]

१०. नियमशास्त्रातील लोभीपणाविरुद्ध असलेली दहावी आज्ञा ही मानव-निर्मित नियमांपेक्षा वरचढ कशी आहे? (निर्ग. २०:१७) [w०६-MR ७/१ पृ. १५-१६ परि. १६]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा