घोषणा
▪ साहित्य सादरता डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करा. घरमालकाला मुले असतील तर बायबल कथांचं माझं पुस्तक सादर करा. जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीच असेल तर प्रचारक पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापण्यात आलेले किंवा १९९२ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक सादर करू शकतात. फेब्रुवारी: पुढील कोणतेही पुस्तक सादर करा: तुमची काळजी करणारा निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी), कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य किंवा बायबल—देवाचे पुस्तक की मानवाचे? (इंग्रजी). मार्च: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा कसोशीने प्रयत्न करा.
▪ आम्ही मंडळीतील कुटुंबांना, संस्थेच्या जुन्या पुस्तकांचा संग्रह करण्याचे उत्तेजन देत आहोत. जुन्या पुस्तकांतील माहिती वाचल्यास, सत्याची समज आणखी गहिरी होण्यास मदत होईल. व्यक्तिगत अभ्यासादरम्यान जुनी पुस्तके वाचण्याचा एक उपक्रम ठेवल्यास, तुमचा व्यक्तिगत अभ्यास आणखी फलदायी होऊ शकतो. शिवाय, सभांची तयारी करतानाही तुम्हाला या माहितीचा बराच उपयोग होऊ शकतो.— km-MR ११/९३ पान १; १/९९ पान ४; ४/०३ पान ५ पाहा.
▪ बायबल कथांचं माझं पुस्तक या पुस्तकाच्या अभ्यास आराखड्यात काही फेरबदल करण्यात आले आहेत. प्रत्येक महिन्याच्या आमची राज्य सेवा यात सुधारित आराखडा दिला जाईल.