वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०८ पृ. १
  • शाखा दफ्तराचे पत्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शाखा दफ्तराचे पत्र
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • शाखा दफ्तराचे पत्र
    आमची राज्य सेवा—२००६
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • शाखा कार्यालयात कोणते काम केले जाते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ९/०८ पृ. १

शाखा दफ्तराचे पत्र

प्रिय राज्य प्रचारकांनो:

गेल्या सेवा वर्षात सर्व राज्य प्रचारकांच्या उत्तम कार्यावर यहोवाचा आशीर्वाद होता. मार्च महिन्यात ७४,३२६ जण ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित होते. व याच महिन्यात २९,०५० बायबल अभ्यासांचा उच्चांक गाठण्यात आला. मे महिन्यात, २९,०६५ प्रचारकांनी क्षेत्र सेवेत भाग घेऊन एक नवीन उच्चांक गाठल्याचे पाहूनही आपल्याला आनंद होतो. याच महिन्यात, २,३४२ बंधूभगिनींनी सामान्य पायनियर बनून एक विक्रमी उच्चांक गाठला.

बायबलच्या संदेशात आवड दाखवणारे बहुतेक लोक, कमी शिकलेले आहेत किंवा त्यांचे शालेय शिक्षण झालेले नाही. शिवाय, ज्यांना बायबलविषयी काडीमात्रही कल्पना नाही अशा वाचकांचा देखील विचार करा. अशा सर्व प्रकारच्या लोकांना समजेल व त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल अशा पद्धतीत आपल्या प्रकाशनांचे भाषांतर होणे आवश्‍यक आहे. (१ तीम. २:४) म्हणूनच, केवळ शिकलेल्या लोकांसाठीच नव्हे तर सामान्य लोकांना व लहान मुलांनाही लगेच समजेल अशा पद्धतीत प्रकाशनांचे भाषांतर करण्याकरता आपल्या भाषांतरकारांना प्रशिक्षण दिले जात आहे. (मत्त. ११:२५) आपल्या प्रकाशनांचे भाषांतर साध्या-सोप्या व समजण्याजोग्या भाषेत केले जात असल्याबद्दल अनेक बंधूभगिनींनी संस्थेला आभारप्रदर्शनाची अनेक पत्रे पाठवली आहेत.—१ करिंथ. १४:९-११.

देवाच्या संघटनेत झुंडीच्या झुंडीने येणाऱ्‍या अनेकांसाठी सभांची उचित ठिकाणे असावीत म्हणून गेल्या सेवा वर्षात भारताच्या सहा विविध ठिकाणी १५ राज्य सभागृहे बांधण्यात आली. हाती कला असलेल्या जवळजवळ ७० स्वयंसेवी बांधवांनी या प्रचंड बांधकाम प्रकल्पांना हातभार लावला आहे. या नवीन सेवा वर्षात आम्ही यहोवाच्या आशीर्वादाने आणखी २५ नवे राज्य सभागृहे बांधण्याची आशा करत आहोत. तेव्हा, तुमच्या अमूल्य देणग्यांद्वारे व मनःपूर्वक प्रार्थनांद्वारे तुम्ही आम्हाला देत असलेल्या पाठिंब्याची आम्ही मनापासून कदर करतो.—नीति. ३:९, १०.

आपले बांधव,

भारत शाखा दफ्तर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा