घोषणा
▪ साहित्य सादरता नोव्हेंबर: थोर शिक्षकाकडून शिका पुस्तक (इंग्रजी). घरमालकाच्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नसल्यास, सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक व त्यासोबत तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यावी. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. याव्यतिरिक्त मंडळीकडे साठा असल्यास, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही या पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तकेही सादर करता येतील. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. जर मंडळीत यांपैकी कोणत्याही पुस्तकांचा साठा नसल्यास, ज्ञान पुस्तक किंवा जागृत राहा! माहितीपत्रक सादर करावे. फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) हे पुस्तक सादर केले जाईल. जर हे पुस्तक उपलब्ध नसेल तर प्रकटीकरणाचा कळस किंवा ज्याचा ज्यादा साठा आहे असे जुने प्रकाशन सादर करावे.
▪ उपलब्ध असलेली नवी ब्रेल प्रकाशने:
यहोवाचा दिवस मनात बाळगून जगणे —इंग्रजी
यहोवाची स्तुती गा (२९ गाणी) —पंजाबी
▪ अमेरिकन संकेत भाषेत उपलब्ध असलेली नवी डीव्हीडी:
कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य