वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०६ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००६
आमची राज्य सेवा—२००६
km ७/०६ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता जुलै व ऑगस्ट: पुढील ३२ पानांचे कोणतेही माहितीपत्रक देऊ शकता: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का? जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी) आणि जागृत राहा! काही ठिकाणी, पुढील माहितीपत्रके सादर करणे योग्य ठरेल: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी), आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), आणि समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करण्यात यावा. हे पुस्तक देण्यात आलेल्या प्रत्येक घरी, गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने पुनर्भेट दिली पाहिजे. बायबल काय शिकवते पुस्तकाबरोबर तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्या. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध! या दोन्ही नियतकालिकाच्या प्रती द्याव्यात. घरमालकाने आवड व्यक्‍त केल्यास, बायबलबद्दल त्याची आस्था वाढवण्याकरता जागृत राहा! हे माहितीपत्रक द्यावे.

▪ सप्टेंबरपासून, विभागीय पर्यवेक्षक “देव तुमच्याविषयी संमती व्यक्‍त करेल का?” हे शीर्षक असलेले जाहीर भाषण देतील.

▪ आम्ही असे सुचवू इच्छितो की सामान्य पायनियर सेवेकरता केलेले अर्ज, विनंती केलेल्या तारखेच्या कमीतकमी ३० दिवसांआधी शाखा दफ्तराला सादर केले जावेत. अर्ज पाठवण्याआधी मंडळीच्या सचिवांनी, ते पूर्णपणे भरले आहेत की नाही याची खात्री करावी. जर अर्जदारांना बाप्तिस्म्याची नेमकी तारीख आठवत नसेल, तर त्यांनी अंदाजे तारीख भरावी आणि या तारखेची नोंद करून ठेवावी. सचिवांनीही या तारखेची मंडळीचे प्रचारक अहवाल कार्ड (S-21) यावर नोंद करावी.

▪ मंडळीतल्या प्रत्येक सामान्य पायनियरचे पायनियर नेमणूक पत्र (S-202) आपल्याजवळ आहे किंवा नाही याची मंडळीच्या सचिवांनी खात्री करावी. जर एखाद्याचे नेमणूक पत्र तुमच्याजवळ नसेल तर शाखा दफ्तराला याविषयी लिहावे.

▪ ऑगस्ट ३१, २००६ किंवा त्यानंतर लवकरात लवकर साहित्य व मासिकांची वार्षिक मोजणी केली जावी. ही वार्षिक मोजणी दर महिन्यात लिटरेचर कोऑर्डिनेटर जी मोजणी करतात त्यासारखीच आहे. एकूण संख्या लिटरेचर इन्व्हेन्टरी (S-18) फॉर्मवर भरावी. मासिकांची एकूण संख्या, मॅगझीन सर्व्हंट सांगू शकतील. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी इन्व्हेन्टरीची तपासणी करावी. त्यांनी व कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी फॉर्मवर सह्‍या कराव्यात. प्रत्येक कोऑर्डिनेटिंग मंडळीला तीन लिटरेचर इन्व्हेन्टरीचे (S-18) फॉर्म्स मिळतील. मूळ फॉर्म भरून कृपया सप्टेंबर ६ तारखेच्या आत शाखा दफ्तराला पाठवावा. फॉर्मची कार्बन प्रत मंडळीच्या फाईलसाठी ठेवावी. तिसरी प्रत हिशेबासाठी वापरू शकता.

▪ सप्टेंबर १५-१७, २००६ या तारखांना कोझीकोड येथे होणार असलेल्या मुक्‍तिसमय जवळ आहे! प्रांतीय अधिवेशनाच्या मुख्यालयाचा पत्ता बदलला आहे याची कृपया नोंद घ्यावी. नवीन पत्ता पुढीलप्रमाणे आहे: T. S. James, 34/761-A, Nithya Jeevan House, Malaparamba P. O., Kozhikode 673 009 KER.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा