वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०६ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००६
आमची राज्य सेवा—२००६
km ३/०६ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता मार्च: बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक सादर करा. बायबल अभ्यास सुरु करण्याचा विशेष प्रयत्न करा. पुस्तकासोबत तुम्हाला बायबलविषयी अधिक जाणून घेण्यास आवडेल का ही पत्रिका द्यावी. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती सादर कराव्यात. आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तींना पुनर्भेट देताना, तसेच जे नियमित सभांना येत नाहीत पण स्मारकविधी व/किंवा ईश्‍वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहतात अशा इतर व्यक्‍तींना भेटताना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू करण्याचा आपला उद्देश असावा. जून: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) हे पुस्तक द्यावे. हे पुस्तक घरमालकाच्या भाषेत उपलब्ध नसल्यास सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक यांपैकी एक पुस्तक द्यावे.

▪ एप्रिल महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे या महिन्यात सहायक पायनियर सेवा करण्याची उत्तम संधी आहे.

▪ स्मारकविधी बुधवार, एप्रिल १२ रोजी साजरा केला जाईल. जर तुमच्या मंडळीची सभा बुधवारी असेल तर तुम्ही ती सभा आठवड्यात दुसऱ्‍या एखाद्या दिवशी (राज्य सभागृह उपलब्ध असल्यास) ठेवू शकता. जर हे शक्य नसेल आणि सेवा सभेवर याचा परिणाम होणार असेल, तर त्या आठवड्याच्या सेवा सभेतील जे भाग खास तुमच्या मंडळीला लागू होतात ते तुम्ही दुसऱ्‍या आठवड्याच्या सेवा सभेत समाविष्ट करू शकता.

▪ स्मारकविधीची तारीख, वेळ व पत्ता यासंबंधीची माहिती निमंत्रणपत्रिकेवर स्टँम्पने किंवा लिहून भरण्याची मंडळीच्या वडिलांनी खात्री करावी. ही माहिती स्पष्टपणे वाचता आली पाहिजे; कागदाच्या दुसऱ्‍या बाजूला काळे डाग पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.

▪ मंडळ्यांना टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या नव्या प्रती मिळताच त्या लवकरात लवकर प्रचारकांना द्याव्यात. यामुळे क्षेत्र सेवेत ती मासिके सादर करण्याआधी त्यांना त्यातील माहितीशी परिचित होण्याची संधी मिळू शकेल. आमची राज्य सेवा याच्या प्रती देखील मंडळीला मिळताच प्रचारकांना देण्यात याव्यात. मंडळीच्या पुस्तक अभ्यास गटांतून बांधवांमध्ये हे साहित्य वाटप केले जाऊ शकते.

▪ नोहा—तो देवाबरोबर चालला (इंग्रजी) हा व्हिडिओ मे महिन्यातील एका सेवा सभेदरम्यान विचारात घेतला जाईल. आवश्‍यकता असल्यास, मंडळीकडून या व्हिडिओच्या प्रती लवकरात लवकर मागवाव्यात.

▪ शाखा दप्तर प्रचारकांच्या वैयक्‍तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्याला मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्ट) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.

▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का?—इंग्रजी

▪ पुन्हा उपलब्ध झालेली इंग्रजीतील संशोधन प्रकाशने:

‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित आणि लाभदायक’

शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स—विथ रेफरेन्सेस (Rbi8)

शास्त्रवचनांतून युक्‍तिवाद

वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स १९८६-२०००

वरील सर्व प्रकाशने स्पेशल रिक्वेस्ट साहित्यात मोडतात याकडे कृपया लक्ष द्यावे. प्रचारकांनी यांपैकी कोणते प्रकाशन मागवण्याची खास विनंती केली असेल तरच ही संस्थेकडून मागवली जावीत. यांपैकी एखाद्या प्रकाशनाची मागणी संस्थेला पाठवण्याआधी सेवा समितीने प्रकाशनाची मागणी करणाऱ्‍या प्रचारकांना भेटून, त्यांना या प्रकाशनाची खरोखरच गरज आहे की नाही याची खात्री करावी व प्रकाशनाच्या मागणी फॉर्मसोबत याविषयीची संक्षिप्त टिपणी जोडावी. असे स्पष्टीकरण नसलेल्या मागण्या पूर्ण केल्या जाणार नाहीत.

▪ उपलब्ध झालेल्या नव्या ऑडियो काँपॅक्ट डिस्क:

आपल्या आध्यात्मिक वारशाची कदर करणे (cdoh) —तामीळ

आपल्या काळाकरता इशारेवजा उदाहरणे (ckwx) —तामीळ, मल्याळम, हिंदी

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? (cdrq) —तामीळ

▪ अमेरिकन साईन लँग्वेजमध्ये उपलब्ध झालेल्या नव्या डिव्हीडी:

सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान (dvkl-ASL)

बायबल नेमके काय शिकवते?(dvbh-ASL)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा