प्रश्न पेटी
◼ इतर देशांतील गरजू बंधूभगिनींच्या साहाय्याकरता देणग्या देण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?
कधीकधी आपण छळ, विपत्ती किंवा इतर कठीण परिस्थितींमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या इतर देशांतील बांधवांविषयी ऐकतो. अशा बांधवांना साहाय्य करण्याच्या इच्छेने, काही बांधव त्या त्या देशांतील शाखा दफ्तराला परस्पर देणग्या पाठवतात आणि त्यासोबत विशिष्ट व्यक्तीला, विशिष्ट मंडळीला किंवा एखाद्या बांधकाम प्रकल्पाला आर्थिक हातभार लावण्याकरता या निधीचा उपयोग केला जावा अशी विनंतीही करतात.—२ करिंथ. ८:१-४.
सहविश्वासू बांधवांबद्दल अशी कळकळ व्यक्त करणे प्रशंसास्पद आहे यात शंका नाही. पण सहसा, देणगी देणाऱ्याच्या मनात असलेल्या विशिष्ट उद्देशापेक्षाही अधिक तातडीच्या गरजा असतात. कधीकधी ज्या समस्येसाठी देणगी पाठवली जाते, ती समस्या आधीच सोडवण्यात आलेली असते. अर्थात, स्थानिक शाखा दफ्तराला जागतिक कार्यासाठी, राज्य सभागृहाच्या बांधकामासाठी, किंवा नैसर्गिक विपत्तीच्या वेळी आर्थिक साहाय्यासाठी ज्या देणग्या पाठवल्या जातात त्या देणगी पाठवणाऱ्याने सूचित केल्यानुसारच वापरल्या जातील याची आपण खात्री बाळगू शकतो.
अनपेक्षित प्रसंगांमुळे उद्भवणाऱ्या गरजांना त्वरित प्रतिसाद देण्याकरता सर्व शाखा दफ्तरांतील बांधवांना पुरेसे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्व प्रसंगी शाखा दफ्तर नियमन मंडळाला सर्व माहिती पुरवते. अधिक मदतीची गरज पडल्यास, नियमन मंडळ जवळपासच्या देशांतील शाखा दफ्तरांना साहाय्य पुरवण्याचे निवेदन करू शकते किंवा वेळप्रसंगी थेट मुख्यालयांतून निधी पाठवला जातो.—२ करिंथ. ८:१४, १५.
तेव्हा जागतिक कार्यासाठी, इतर देशांतील बांधकाम प्रकल्पांसाठी किंवा विपत्तीच्या प्रसंगी साहाय्यासाठी सर्व देणग्या मंडळीद्वारे किंवा परस्पर, तुम्ही ज्या देशात राहता त्या देशातील शाखा दफ्तराला पाठवल्या जाव्यात. अशाप्रकारे, नियमन मंडळाने स्थापन केलेल्या संघटनीय व्यवस्थांच्या माध्यमाने ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ जागतिक बंधूसमाजाच्या गरजा सुव्यवस्थित रित्या पार पाडू शकतो.—मत्त. २४:४५-४७; १ करिंथ. १४:३३, ४०.