घोषणा
◼ साहित्य सादरता सप्टेंबर: समाधानी जीवन माहितीपत्रक. तुमच्या भाषेत हे प्रकाशन उपलब्ध नसल्यास, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या वैयक्तिक प्रती सादर कराव्यात. घरमालकाने आस्था दाखवल्यास कृपया अपेक्षा माहितीपत्रक दाखवा आणि गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने पुनर्भेटी करा. नोव्हेंबर: समाधानी जीवन माहितीपत्रक. हे तुमच्या भाषेत उपलब्ध नसल्यास, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य सादर करावे. किंवा, पर्यायी सादरता म्हणून बायबल कथांचं माझं पुस्तक आणि तुम्ही पृथ्वीवर अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तके सादर करा.
◼ डिसेंबर महिन्यातील सेवा सभेत आपण नो ब्लड—मेडिसीन मीट्स द चॅलेंज या व्हिडिओची चर्चा करणार आहोत. हा कार्यक्रम आता, ट्रान्सफ्यूजन ऑल्टरनेटिव्ह—डॉक्यूमेंटरी सिरीज याचा भाग म्हणून व्हिसिडीवर उपलब्ध आहे. तीन व्हिसिडींच्या या संचात पुढील कार्यक्रम आहेत: ट्रान्सफ्यूजन-ऑल्टरनेटीव्ह स्टॅटजीज—सिंपल, सेफ, इफेक्टीव्ह; ट्रान्सफ्यूजन-ऑल्टरनेटीव्ह हेल्थ केअर—मिटिंग पेशंट नीड्स ॲण्ड राईट्स; आणि नो ब्लड—मेडिसीन मीट्स द चॅलेंज. हे सर्व इंग्रजीतच आहेत. या व्हिसिडी तुम्हाला हव्या असल्यास, लवकरात लवकर मंडळीद्वारे त्यांची मागणी केली पाहिजे.
◼ २००५ सालच्या स्मारकविधीच्या काळातील खास जाहीर भाषण रविवार एप्रिल १० तारखेला दिले जाईल. भाषणाचा विषय नंतर कळवला जाईल. त्या रविवारी ज्या मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल किंवा संमेलन असेल त्या मंडळ्यांमध्ये जाहीर भाषण पुढील आठवडी दिले जाईल. रविवार एप्रिल १०, २००५ याच्या आधी कोणत्याही मंडळीत जाहीर भाषण दिले जाऊ नये.
◼ सामान्य पायनियर नियुक्ती पत्राच्या मागील बाजूला, “डिसकंटीन्यूएशन,” “चेंज ऑफ काँग्रीगेशन” आणि “नेम चेंज” या मथळ्याखाली प्रत्येक बाबतीत काय करण्याची आवश्यकता आहे याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. यांपैकी एखादी परिस्थिती उद्भवल्यास, ती हाताळताना मंडळीच्या सचिवांनी सर्व सूचनांचे पालन करावे.
◼ बहिष्कृत केलेल्यांना किंवा ज्यांनी मंडळीशी आपला संबंध तोडला आहे अशांना जाऊन भेटण्याच्या संबंधाने, टेहळणी बुरूज एप्रिल १५, १९९१, पृष्ठे २१-३ वरील सूचना पाळण्याची सर्व वडिलांना आठवण करून दिली जाते.
◼ मंडळ्यांनी, टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचे नवीन अंक होता होईल तितक्या लवकर प्रचारकांना द्यावेत. यामुळे, प्रचारकांना क्षेत्र सेवेत नियतकालिके सादर करण्यापूर्वी ती स्वतः वाचून काढता येतील आणि त्यातील विषय समजून घेता येतील.
◼ ऑक्टोबर महिन्यात पाच शनिवार-रविवार असल्यामुळे, साहाय्यक पायनियरींग करण्याकरता हा उत्तम महिना ठरेल.
◼ नवीन सेवा वर्षाच्या वापरासाठी, प्रत्येक मंडळीला वार्षिक सेवा फॉर्म्सचा पुरेसा साठा पाठवण्यात येत आहे. पाठवलेला साठा, पुढील सेवा वर्षासाठी पुरेसा आहे की नाही याची मंडळीच्या सचिवांनी खात्री करावी. यांपैकी कोणत्याही फॉर्म्सचा आणखी साठा हवा असेल तर सप्टेंबरच्या तुमच्या लिटरेचर रिक्वेस्टसोबत कृपया त्यांची लवकरात लवकर मागणी करावी.
◼ शाखा दफ्तर आता, साहित्य आणि नियतकालिकांच्या मागण्यांची तत्परतेने पूर्ती करण्यास तयार असल्यामुळे इथूनपुढे तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच, लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) आणि काँग्रीगेशन रिक्वेस्ट (M-202) पाठवू शकता. यामुळे साहित्य आणि नियतकालिकांचे काम पाहणाऱ्यांना सोपे जाईल.
◼ नवीन प्रकाशने उपलब्ध:
बोलण्याची व शिकवण्याची क्षमता कशी सुधारायची —नेपाळी
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
चर्चेसाठी बायबलचे विषय —आसामी, गुजराती, पंजाबी
देवाचे मार्गदर्शन—परादीसचा आपला मार्ग —बंगाली
तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा —मल्याळम