घोषणा
▪ साहित्य सादरता ऑगस्ट: पुढे सुचवलेल्या कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकांचा उपयोग करता येऊ शकतो: चिरकाल टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, व मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—मदत अथवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्धाविना जग असेल का? (इंग्रजी) व सर्व लोकांसाठी एक पुस्तक ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात. सप्टेंबर: विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार हे माहितीपत्रक आणि जीवन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की उत्पत्तीने? (इंग्रजी) हे पुस्तक. पर्यायी सादरता म्हणून, तुम्ही सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे ही पुस्तके देऊ शकता. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. आस्था दाखवणाऱ्या लोकांना अपेक्षा माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. लोकांकडे ही प्रकाशने आधीपासूनच असतील तर कोणतेही जुने प्रकाशन तुम्ही देऊ शकता.
▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने सप्टेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
▪ ऑगस्ट ३१, २००२ किंवा त्यानंतर लवकरात लवकर साहित्य व मासिकांची वार्षिक मोजणी केली जावी. ही वार्षिक मोजणी दर महिन्यात लिटरेचर कोऑर्डिनेटर जी मोजणी करतात त्यासारखीच आहे. एकूण संख्या लिटरेचर इन्व्हेन्टरी फॉर्मवर (S-18) भराव्यात. मासिकांची एकूण संख्या, लिटरेचर ग्रूपमध्ये असणाऱ्या प्रत्येक मंडळीचे मॅगझीन सर्व्हंट सांगू शकतील. प्रत्येक कोऑर्डिनेटिंग मंडळीला तीन लिटरेचर इन्व्हेन्टरी फॉर्म्स (S-18) पाठवले जातील. यांपैकी मूळ फॉर्म भरून कृपया सप्टेंबर ६ च्या आत संस्थेला पाठवावा. फॉर्मची कार्बन प्रत मंडळीच्या फाईलसाठी ठेवावी. तिसरी प्रत हिशेबासाठी वापरू शकता. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी इन्व्हेन्टरीची तपासणी करावी. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी व अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी फॉर्मवर सह्या कराव्यात.
▪ कधीकधी, मंडळीसमोर व प्रचारकांसमोर यहोवा देवाची आपण करत असलेली उपासना यासंबंधाने काही कायदेशीर समस्या येतात. याबाबतीत आपली मदत व्हावी म्हणून १९५० साली सुवार्तेसंबंधीचे प्रत्युत्तर व समर्थन (इंग्रजी), नावाची पुस्तिका तयार करण्यात आली होती. गत काळात या पुस्तिकेचा उपयोग करण्यात आलेला असला तरी, त्यातील कायदेशीर माहिती आता अद्ययावत राहिलेली नाही. तेव्हा, प्रचारकांनी व वडील वर्गाने या पुस्तिकेतील माहितीच्या आधारावर कायदेशीर बाबी हाताळण्याचा प्रयत्न करू नये.
▪ पत्रे व पोस्टकार्ड यांवर अपुरी तिकिटे चिकटवल्यामुळे शाखा दफ्तराला दर महिन्याला पोस्टाचे दंड भरण्यासाठी बरीच रक्कम द्यावी लागत आहे. तेव्हा, शाखा दफ्तराला पत्र/पोस्टकार्ड पाठवताना तुम्ही त्यावर उचित तिकिट चिकटवले आहे याची कृपया चांगल्याप्रकारे खात्री करा.