घोषणा
▪ साहित्य सादरता मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न केला जाईल. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. इच्छा असल्यास आपण जगव्याप्त कार्यासाठी वर्गणी देऊ शकता असे प्रचारक घरमालकांना सांगू शकतात. आवड दाखवणाऱ्या लोकांना अपेक्षा माहितीपत्रक द्यावे व बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. घरमालकांकडे ही प्रकाशने आधीच असतात तेव्हा मंडळीकडे साठा असलेले उचित माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते.
▪ एप्रिल महिन्यात साहाय्यक पायनियरींग करू इच्छिणाऱ्या प्रचारकांनी आताच त्याची योजना करून होता होईल तितक्या लवकर आपले फॉर्म भरून द्यावेत. यामुळे वडिलांना क्षेत्र सेवेच्या योजना करता येतील, पुरेशी मासिके आणि इतर साहित्ये मागवण्यास वेळ मिळेल. साहाय्यक पायनियर म्हणून ज्यांना मान्यता दिली जाते त्यांची नावे दर महिन्याला मंडळीत घोषित केली जावीत.
▪ स्मारक विधी गुरुवार मार्च २८, २००२ रोजी असेल. गुरुवारच्या दिवशी तुमच्या मंडळीच्या सभा असतील तर त्या, आठवड्यातल्या कोणत्याही इतर दिवशी भरवल्या जाऊ शकतात ज्या दिवशी तुमचा सभागृह उपलब्ध असेल. हे शक्य नसेल व तुमच्या सेवा सभेवर याचा परिणाम होत असेल तर तुमच्या मंडळीला खास लागू होणारे भाग दुसऱ्या सेवा सभेच्या वेळी सामील करावेत.
▪ शाखा दप्तर प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्याला मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्टची) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
▪ सर्व मंडळ्यांनी हव्या असलेल्या भाषांमध्ये, यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी), या माहितीपत्रकाच्या पुरेशा साठ्याची ऑर्डर द्यावी. यामुळे, मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या सुरवातीपासून सुरू होणाऱ्या नवीन शालेय वर्षी पालक आणि शाळेला जाणारी त्यांची मुले पूर्णपणे तयार असतील.
▪ नियतकालिकांच्या व प्रकाशनांच्या उत्पादनाच्या व पोस्टाच्या खर्चांच्या संदर्भात नियुक्त बांधवांनी व प्रत्येक प्रचाराकाने पुढील गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास संस्थेला आर्थिकरीत्या मदत होऊ शकते:
मंडळ्यांकडून मिळालेली सप्टेंबर १, २००१ ची वार्षिक लिटरेचर इन्व्हेंट्री दाखवून देते, की पुष्कळ मंडळ्यांकडे पुस्तकांचा व माहितीपत्रकांचा इतका साठा आहे की तो अनेक वर्षांपर्यंत पुरेसा आहे. आणि अशा मंडळ्या अधिक प्रकाशनांसाठी आपल्या ऑर्डर पाठवत असतात. नवीन साठा मागवण्याआधी आपल्याजवळ आधीपासून असलेला साठा आधी संपवावा असे सर्व मंडळ्यांना उत्तेजन दिले जाते. मंडळ्यांनी फक्त तीन महिन्यांसाठी प्रकाशने साठवावीत. यास्तव, संस्थेला लिटरेचर रिक्वेस्ट पाठवण्याआधी, सेवा पर्यवेक्षकाने व्यक्तिशः, मंडळीकडे प्रमाणापेक्षा अधिक साठा तर नाही याची खात्री करावी.
मंडळीच्या सचिवांनी व सेवा पर्यवेक्षकांनी याची खात्री करावी, की त्यांच्या मंडळीत नियतकालिके साठत चाललेली नाहीत. मासिके साठली असतील तर होता होईल तितक्या लवकर ती लोकांना वाटण्यासाठी खास मोहिमांची योजना करावी व मंडळीने नियतकालिकांची मागणी कमी करण्याकरता शाखा दफ्तराला सुधारित ऑर्डर पाठवावी. प्रचारकांच्या घरातही मासिके व प्रकाशने साठता कामा नये. सर्व प्रचारकांनी आपल्या व्यक्तिगत वापरापुरती आणि क्षेत्र सेवेत लोकांना देण्यापुरतीच प्रकाशनांची ऑर्डर द्यावी.
▪ भारताच्या शाखा दफ्तराची बंगळूर येथील नव्या कार्यस्थळी बदली होणार असल्यामुळे, प्रकाशनांच्या व नियतकालिकांच्या मागण्या २००२ मार्चच्या मध्यापासून ते एप्रिलच्या मध्यापर्यंत स्वीकारल्या जाणार नाहीत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.