घोषणा
◼ साहित्य सादरता जुलै व ऑगस्ट: पुढे सुचवलेल्या कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकांचा उपयोग करता येऊ शकतो: चिरकाल टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! व मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—मदत अथवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्धाविना जग असेल का? (इंग्रजी) व सर्व लोकांसाठी एक पुस्तक ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात. सप्टेंबर: विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार हे माहितीपत्रक आणि जीवन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की उत्पत्तीने? (इंग्रजी) हे पुस्तक. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. आस्था दाखवणाऱ्या लोकांबरोबर मॅग्झीन रूट सुरू करण्यासाठी पुनर्भेटी करा. मॅग्झीन रूट सुरू करणे जेथे शक्य नाही केवळ तेथेच वर्गणी सादर करावी.
◼ सप्टेंबरपासून विभागीय पर्यवेक्षक, “खरे ख्रिस्ती देवाच्या शिकवणुकीला सन्मान कसा मिळवून देतात” या विषयावर जाहीर भाषण देतील.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान —मिझो
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य —हिंदी
दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! —पंजाबी
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —सिंधी