वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०० पृ. १
  • “आम्ही शांत बसू शकत नाही”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आम्ही शांत बसू शकत नाही”
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • धैर्याने देवाचे वचन बोलत राहा
    उपासनेतील ऐक्य
  • ‘देवाचे वचन धैर्याने बोला’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • धैर्याने सुवार्ता घोषित करा
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ‘आम्ही देवाला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे’
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ७/०० पृ. १

“आम्ही शांत बसू शकत नाही ”

१ जगव्याप्त प्रचार कार्याकडे आज येशू ख्रिस्त जातीने लक्ष देत आहे. (मत्त. २८:२०; मार्क १३:१०) जवळजवळ साठ लाख यहोवाचे साक्षीदार २३४ देशांत राज्याची सुवार्ता घोषित करत आहेत; पण याचा अर्थ आपले प्रचार कार्य आता संपले आहे असे आपण समजू नये. देव जोपर्यंत आपल्याला हे कार्य थांबवायला सांगत नाही तोपर्यंत आपण “शांत बसू शकत नाही.”—प्रे. कृत्ये ४:२०, ईजी टू रीड व्हर्शन.

२ देवाच्या आत्म्यावर विसंबून राहा: आपण यहोवाचे कार्य करू नये म्हणून सैतान आपल्यावर असंख्य मार्गांनी दबाव आणतो. (प्रकटी. १२:१७) स्वतःच्या अपरिपूर्णतेमुळेही आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा समस्या व दबाव येतात तेव्हा साहजिकच प्रचाराच्या सर्वात महत्त्वपूर्ण कार्याकडे आपले दुर्लक्ष होऊ शकते. पण आठवणीत असू द्या, जर आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला तर त्याचा आत्मा आपल्याला कोणत्याही अडथळ्यावर मात करायला मदत करेल.

३ पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीचा अतोनात छळ करण्यात आला. तेव्हा बांधवांनी देवाला प्रार्थना केली आणि त्याचे वचन इतरांना निर्भयपणे सांगण्याकरता त्याच्याकडे मदतीची याचना केली. यहोवाने त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर दिले; त्याने त्यांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण केले आणि प्रचार कार्य अखंडपणे करत राहण्याकरता त्यांच्यात उत्साह व दृढनिश्‍चयी वृत्ती उत्पन्‍न केली. यामुळेच ते दररोज धैर्याने सुवार्ता सांगत राहिले.—प्रे. कृत्ये ४:२९, ३१; ५:४२.

४ टीका करणाऱ्‍यांना घाबरू नका: लोक आपल्याविषयी वाईट मत व्यक्‍त करतात किंवा काही लोक जेव्हा आपल्याबद्दल खोटी माहिती प्रसिद्ध करतात तेव्हा आपल्याला भीती वाटू शकते. पण पेत्राने व इतर प्रेषितांनी यहुदी महासभेला दिलेले उत्तर तुम्हाला आठवते का? (प्रे. कृत्ये ५:२९-३२) नियमशास्त्राचा शिक्षक गमलियेल याने म्हटल्याप्रमाणे देवाचे काम कोणीही थांबवू शकत नाही. हे काम आपण स्वतःच्या शक्‍तीने करत नाही. या महान कार्याला देवाचा पाठिंबा आहे आणि तोच हे कार्य पूर्णत्वाला नेईल!—जख. ४:६.

५ तेव्हा, यहोवाच्या आत्म्याची मदत मिळावी म्हणून त्याला दररोज प्रार्थना करा; सुवार्ताप्रसाराचे कार्य आवेशाने करत राहण्याकरता त्याला मदत मागा. राज्याच्या प्रचाराबद्दल आपली मनोवृत्ती यिर्मयासारखी असली पाहिजे; त्याला देवाचे वचन हे हाडात कोंडलेला अग्नी जळत आहे असे वाटायचे. (यिर्म. २०:९) त्याच्याप्रमाणे आपणही शांत बसू शकत नाही!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा