घोषणा
◼ एप्रिल आणि मे महिन्यांकरता साहित्य सादरता: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या किरकोळ प्रती. आस्था दाखवणाऱ्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर लक्ष द्या. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतीही ३२ पृष्ठांची माहितीपत्रके: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या— त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, स्पिरिट्स ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रिअली एग्झिस्ट?, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक.
◼ संस्थेकडे १९५१ ते १९५९, १९८२ ते १९८४, १९९२ आणि १९९७ ते १९९८ च्या इंग्रजी टेहळणी बुरूज मासिकांचे आणि १९९२ आणि १९९७ ते १९९८ च्या इंग्रजी सावध राहा! मासिकांचे खंड उपलब्ध आहेत. ज्या प्रचारकांना अथवा नवीन मंडळ्यांना ही प्रकाशने हवी असतील त्यांनी मंडळीच्या साहित्य सेवकामार्फत आपली ऑर्डर पाठवावी.
◼ लवकरच वॉचटावर लायब्ररी—१९९९ आवृत्ती सीडी-रोमवर (CD-ROM) उपलब्ध केली जाईल. या आवृत्तीची ऑर्डर करताना मंडळ्यांनी लिट्रेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) भरून संस्थेला पाठवावा. एक मात्र लक्षात ठेवा, हे साधन जनतेसाठी, शालेय ग्रंथालयांसाठी किंवा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल वरवर आस्था दाखवणाऱ्यांसाठी नाही. वॉचटावर लायब्ररी—१९९९ हे साधन खासकरून मंडळीच्या सदस्यांसाठी आहे आणि केवळ मंडळीमार्फतच ते दिले जाईल. पण, या कॉम्पॅक्ट डिस्कचा साठा मिळेपर्यंत काँग्रीगेशन पॅकिंग लिस्टवर हे साधन “पेंडिंग” (बाकी) असे दाखवले जाईल.
◼ जानेवारीच्या स्टेटमेन्टबरोबर सर्व मंडळ्यांना स्पेशल रिक्वेस्ट फॉर्म्स फॉर ॲन्यूअल आयटम्स पाठवण्यात आले होते. ज्या मंडळ्यांनी अद्याप २००० साठी अधिवेशन बॅज काड्र्सची तसेच वर्ष २००१ साठी वार्षिक साहित्यांच्या साठ्याची ऑर्डर पाठवलेली नसेल त्यांनी ती लगेच पाठवावी. पण, तुम्हाला (प्लॅस्टिक) बॅज कार्ड होल्डर्स हवे असतील तर तुमच्या नेहमीच्या लिट्रेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-14) ते मागवावेत, शक्यतो इतर साहित्यांसोबतच ते मागवावेत कारण फार छोटे पार्सल असेल तर ते पोस्टात गहाळ होण्याची शक्यता आहे.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
जेहोवा हू इज ही? (पत्रिका क्र. २३)—आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, मिझो, नेपाळी, ओरिया, तमीळ आणि तेलगू.
डज गॉड होल्ड अस रिस्पॉन्सिबल? ऑर डज फेट रूल आवर लाइव्झ? (पत्रिका क्र. ७१)—आसामी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम, तमीळ आणि तेलगू.
द ग्रेटेस्ट नेम (पत्रिका क्र. ७२)—आसामी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम, तमीळ आणि तेलगू.
हू आर जेहोवाज व्हिटनेसेस? (पत्रिका क्र. ७३)—आसामी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम, तमीळ आणि तेलगू.
हेलफायर—इज इट पार्ट ऑफ डिव्हाइन जस्टिस? (पत्रिका क्र. ७४)—आसामी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम, तमीळ आणि तेलगू.