घोषणा
◼ मार्च: महिन्याकरता साहित्य सादरता: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या पुस्तकातून गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या किरकोळ प्रती. आस्था दाखवणाऱ्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर जास्त लक्ष द्या.
◼ एप्रिल आणि मे महिन्यांत सहायक पायनियरिंग करू इच्छिणाऱ्या प्रचारकांनी आताच योजना आखून आपले अर्ज लवकरात लवकर द्यावेत. त्यामुळे क्षेत्र कार्यासाठी वडिलांना आवश्यक योजना करता येतील; शिवाय, नियतकालिकांचा आणि साहित्यांचा पुरेसा साठा देखील तयार ठेवता येईल. सहायक पायनियरिंगसाठी ज्यांचे अर्ज मान्य झाले आहेत अशा सर्वांची नावे मंडळीत घोषित केली जावीत.
◼ आमची राज्य सेवा याच्या या अंकात पे अटेन्शन टू डॅनियल्स प्रॉफेसी या पुस्तकाच्या अभ्यासाचा संपूर्ण आराखडा देण्यात आला आहे. त्याची झेरॉक्स कॉपी काढून तुमच्या अभ्यासाच्या पुस्तकात संदर्भासाठी तुम्ही ठेवू शकता.
◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकाने किंवा त्याने नेमलेल्या एखाद्या बांधवाने मार्च १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
◼ या वर्षीचा स्मारकविधी बुधवार, एप्रिल १९, २००० रोजी पार पाडण्यात येईल. तुमच्या मंडळीच्या सभा सहसा बुधवारच्या दिवशी होत असतील तर आठवड्याच्या दुसऱ्या कोणत्याही दिवशी जेव्हा राज्य सभागृह उपलब्ध असेल त्या दिवशी या सभा घ्याव्यात. पण, सभागृह उपलब्ध नसल्यामुळे सेवा सभा घेणे शक्य नसेल तर जे भाग खास तुमच्या मंडळीला लागू होतात ते दुसऱ्या एखाद्या सेवा सभेत हाताळले जावेत.
◼ मंडळीतल्या सर्वांनी टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या सर्व नवीन व नूतनीकरण वर्गण्या तसेच त्यांच्या व्यक्तिगत वर्गण्याही मंडळीमार्फतच पाठवाव्यात.
◼ संस्था, प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्यात मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; यामुळे, ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाला कळवू शकतील. कोणती प्रकाशने, खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्टची) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
◼ भारतातील “देवाचे भविष्यसूचक वचन” या प्रांतीय अधिवेशनाची एकूण उपस्थिती ३०,४६२ इतकी होती. हे उपस्थितीचे नवीन शिखर असून यात मागील वर्षाच्या तुलनेत १०% वाढ झाली आहे. देशभरात सत्तावीस ठिकाणी भरलेल्या या अधिवेशनात एकूण ८८१ लोकांनी बाप्तिस्मा घेतला.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
बायबल टॉपिक फॉर डिस्कशन, आणि एलिमेन्टरी बायबल टिचिंग्स—मिझो भाषेत