घोषणा
◼ फेब्रुवारी महिन्याकरता साहित्य सादरता: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या महिन्यात गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न केला जाईल. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वार्षिक वर्गण्या. आस्था दाखवणाऱ्यांसाठी अपेक्षा माहितीपत्रकही सोबत न्यावे आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करावा.
◼ मार्च २२, १९९९ ने सुरू होणाऱ्या आठवड्यापासून मंडळीच्या पुस्तक अभ्यासात सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी आमची राज्य सेवा याच्या चालू अंकात अभ्यासाचा पूर्ण आराखडाच दिलेला आहे. पटकन पडताळता यावा म्हणून या आराखड्याची झेरॉक्स करून तुम्ही ती आपल्या पुस्तकात ठेवू शकता. पुस्तकाची प्रस्तावना कशी हाताळली जावी याची माहिती एप्रिल १९९३ ची आमची राज्य सेवा याच्या ८ व्या पानावर दिलेल्या “सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्याचा अभ्यास” या लेखाच्या ५ व्या परिच्छेदात दिलेली आहे.
◼ सचिवाने आणि सेवा पर्यवेक्षकाने सर्व नियमित पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. त्यांच्यापैकी कोणाला आपले आवश्यक तास भरून काढण्यात काही अडचण असल्यास त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी वडिलांनी काही योजना आखावी. यावरील उपयुक्त सूचनांसाठी संस्थेच्या ऑक्टोबर १ च्या S-201 वार्षिक पत्रांची उजळणी करावी. तसेच ऑक्टोबर १९८६ ची आमची राज्य सेवा पुरवणी यातील परिच्छेद १२-२० देखील पाहा.
◼ जानेवारी १५ १९९९ च्या अंकापासून उर्दू भाषेतील टेहळणी बुरूज पंधरवडा आवृत्ती म्हणून उपलब्ध होईल.