घोषणा
◼ सप्टेंबरसाठी: साहित्य सादरता: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. पर्याय म्हणून निर्मिती (इंग्रजी) किंवा अनंतकाल जगू शकाल ही पुस्तके सादर केली जाऊ शकतात. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. वर्गणी नाकारल्यास टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या किरकोळ प्रती सादर केल्या जाऊ शकतात. नोव्हेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. डिसेंबर: नवे जग भाषांतर यासोबतच सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान.
◼ अध्यक्ष पर्यवेक्षकांनी अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने सप्टेंबर १ रोजी अथवा त्यानंतर होता होईल तितक्या लवकर मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यानंतर मंडळीत त्याची घोषणा करण्यात यावी.
◼ पुनःस्वीकार केला जावा अशी इच्छा दाखवलेल्या कोणाही बहिष्कृत अथवा अलिप्त केलेल्या व्यक्तींच्या बाबतीत फेब्रुवारी १, १९९२, टेहळणी बुरूज, पृष्ठे १६-९ वर दिलेल्या सूचना अनुसरण्याची वडिलांना आठवण करून दिली जात आहे.
◼ मंडळीशी सहवास राखणाऱ्यांनी टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या सर्व नवीन व नुतनीकरण वर्गण्या तसेच त्यांच्या व्यक्तीगत वर्गण्याही मंडळीमार्फत पाठवाव्यात.
◼ संस्था, प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची मासिक साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी प्रत्येक महिन्याला एक घोषणा करण्याची योजना करावी; यामुळे, वैयक्तिक साहित्य प्राप्त करू इच्छिणारे सर्वजण साहित्य हाताळणाऱ्या बांधवास त्याबद्दलची माहिती देऊ शकतील. कोणती प्रकाशने, खास मागणीची आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
◼ या वर्षी तामीळनाडूमध्ये प्रांतीय अधिवेशने आयोजित करण्यात आली आहेत. त्यांची स्थाने, तारखा आणि अधिवेशन मुख्यालये पुढीलप्रमाणे आहेत: कोईमतूर: नोव्हेंबर २७-२९ — D. P. Chellapa, 105, Sanganoor Main Road, Ganapathy, Coimbatore, TN - 641 006
मदुराई: डिसेंबर २५-२७ — K. P. Samuel, 123, Lake View Garden, 1st Street, K.K. Nagar, Madurai, TN - 625 020
◼ चेन्नईमध्ये होणारे (तामीळ) प्रांतीय अधिवेशन फेरनियोजित केले असून ते ऑक्टोबर ९-११, १९९८ या तारखेस भरविले जाईल.
◼ प्रत्येक मंडळीतील सचीव प्रांतीय अधिवेशनसंबंधित बाबींचे पर्यवेक्षण करतील.
◼ उपलब्ध असलेले नवीन प्रकाशन:
बोलण्यात व शिकवण्यात कुशल कसे व्हावे? (प्रशाला मार्गदर्शन पुस्तकातील [इंग्रजी] अध्याय २०-२८)—हिंदी