वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९८ पृ. ३-५
  • पाहिजेत—आणखीन बायबल अभ्यास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पाहिजेत—आणखीन बायबल अभ्यास
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • पुनर्भेटींमुळे बायबल अभ्यास मिळतात
    आमची राज्य सेवा—२००३
  • पुनर्भेट घेण्याची खात्री बाळगा
    आमची राज्य सेवा—१९९२
  • तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास सादर करता का?
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ५/९८ पृ. ३-५

पाहिजेत—आणखीन बायबल अभ्यास

१ यहोवा देव, आपल्या पार्थिव संघटनेची अखंड वृद्धी करून तिला आशीर्वादित करत आहे. मागील सेवा वर्षात, जगभरात ३,७५,९२३ जणांचा बाप्तिस्मा झाला होता—प्रती दिवशी सरासरी १,००० किंवा ताशी सुमारे ४३ नवीन शिष्य! आपल्या बांधवांनी दशकानुदशके संकटप्रसंगांना तोंड दिले असले तरीही जगाच्या पाठीवरील विविध भागांत राज्य कार्याची भरभराट होत असून उल्लेखनीय वाढीची प्रचिती मिळत आहे. सुवार्तेचा प्रसार करण्याकरता केल्या जाणाऱ्‍या प्रगतीविषयी वाचणे उत्तेजनात्मक आहे!

२ मागील सेवा वर्षात भारतातील शाखेत सरासरी, एकूण प्रचारक आणि सहायक पायनियर, प्रचार कार्यात खर्च केलेले तास आणि वाटप केलेली पुस्तके, पुस्तिका, माहितीपत्रके व नियतकालिके यांमध्ये वाढ झाल्याचे देखील आपण पाहिले. बाप्तिस्मा घेतलेल्यांच्या संख्येतही वाढ झाली होती आणि स्मारकविधीच्या उपस्थितीचा उच्चांक तर अभूतपूर्व होता. पुनर्भेटी आणि बायबल अभ्यासाच्या कार्याबाबत काय? प्रचारकांची संख्या आठ टक्क्यांनी वाढली असली तरी पुनर्भेटीत अगदी किंचित—केवळ ०.५ टक्क्यांनी वाढ झाली होती—तर बायबल अभ्यासांत आपल्याकडे चार टक्के घट झाली होती. आणि तरीही सेवेचे हे पैलू, शिष्य बनविण्यासाठी अत्यावश्‍यक आहेत. पुनर्भेटी आणि बायबल अभ्यासांतील ही नकारात्मक वहिवाट बदलण्यासाठी आपण प्रत्येकजण काही करू शकतो का?

३ अभ्यास संचालित करण्याची इच्छा प्रबळ करा: आध्यात्मिकरित्या बळकट आणि क्रियाशील राहण्यावर आपण स्वतःच लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ख्रिस्ताचे खरे अनुयायी, “चांगल्या कामांमध्ये आवेशी,” असतात. (तीत २:१४; पं.र.भा.) आपण आपल्या सेवेचे पुनरावलोकन करतो तेव्हा क्षेत्रातील सर्व साहित्य वाटपांचा मागोवा घेण्यास आपल्याला अतीव उत्सुकता आहे असे आपण म्हणू शकतो का? आस्था दाखविणाऱ्‍या सर्वांना गृह बायबल अभ्यास देण्यास आपण उत्साही आहोत का? (रोम. १२:११) की पुनर्भेटी करण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास अधिक इच्छा विकसित करण्याची आपल्याला गरज आहे?

४ व्यक्‍तिगत बायबल वाचन, सभांची नियमित उपस्थिती आणि प्रकाशनांचा अभ्यास या गोष्टी आपल्याला आध्यात्मिकरित्या सजीव ठेवतील व देवाच्या आत्म्याद्वारे आपल्याला सामर्थ्यवान करतील. (इफिस. ३:१६-१९) यामुळे यहोवावरील आपला विश्‍वास आणि भरवसा तसेच सहमानवावरील आपले प्रेम अतूट होईल. शिवाय, दुसऱ्‍या कोणा व्यक्‍तीस सत्य शिकविण्यास आपण उत्तेजित होऊ आणि त्यायोगे आपली सेवा मनोरंजक, यशस्वी आणि चेतनादायी बनवू. होय, आपल्याला आणखीन बायबल अभ्यासांची आस असण्यास हवी!

५ प्रथम कुटुंबासोबत अभ्यास करा: घरामध्ये मुले असल्यास आपल्या नियमित कौटुंबिक बायबल अभ्यासाच्या कार्यक्रमासंबंधी पालकांनी चिंतीत असले पाहिजे. (अनु. ३१:१२; स्तोत्र १४८:१२, १३; नीति. २२:६) आपल्या मुलांना, बाप्तिस्मा न झालेले प्रचारक आणि नंतर समर्पण व बाप्तिस्मा यांसाठी योग्य बनविण्याकरता पालकांनी मुलांसोबत अपेक्षा माहितीपत्रकाचा आणि मग ज्ञान पुस्तकाचा अभ्यास करणे अतिशय लाभदायक ठरेल. अर्थात, मुलाची गरज आणि वय लक्षात घेऊन अतिरिक्‍त साहित्य देखील विचारात घेतले जाऊ शकते. बाप्तिस्मा न झालेल्या आपल्या मुलासोबत अभ्यास करणारे पालक, मे १९८७ आमची राज्य सेवा (इंग्रजी) यातील प्रश्‍न पेटीत सांगितल्यानुसार अभ्यास, वेळ आणि पुनर्भेटीची मोजणी करू शकतात.

६ वैयक्‍तिक संघटन सुधारा: वाटप केलेल्या नियतकालिकांची, माहितीपत्रकांची आणि पुस्तकांची संख्या लक्षात घेता, असंख्य बीज विखुरले जात आहेत यात शंका नाही. पेरणी केलेल्या सत्याच्या या बिजांमध्ये नवीन शिष्य उत्पन्‍न करण्याची अफाट शक्‍ती दडलेली असते. परंतु, एखादा शेतकरी किंवा माळी सतत पेरणी करत राहिला आणि एवढी सर्व मेहनत केल्यानंतर त्याने कापणीच केली नाही तर तो खरोखरच समाधानी असू शकतो का? निश्‍चितच नाही. त्याचप्रमाणे, मागोवा-सेवा देखील जरूरीची आहे.

७ पुनर्भेटी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे वेळ राखून ठेवता का? आस्था दाखविली जाते तेथे तत्परतेने पुन्हा भेट द्या. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने पुनर्भेटी करा. पुनर्भेटींचा एक सुव्यवस्थित, अद्ययावत आणि सुसंघटित अहवाल तुम्ही ठेवता का? घरमालकाच्या नावपत्त्यासोबतच पहिली भेट केव्हा घेतली गेली त्या तारखेची, वाटपांची, चर्चा केलेल्या विषयाच्या संक्षिप्त वर्णनाची आणि पुढील भेटीत विकसित केल्या जाऊ शकणाऱ्‍या विषयाची खात्रीने नोंद करा. प्रत्येक पुनर्भेटीनंतर अतिरिक्‍त माहितीची नोंद करण्यासाठी तुमच्या नोंदपत्रकावर जागा राखा.

८ पुनर्भेट कशी करावी याचे विश्‍लेषण करा: एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीची पुनर्भेट घेताना कोणते काही मुद्दे लक्षात ठेवावेत? (१) स्नेहपूर्ण, मैत्रीपूर्ण, उत्साही आणि अनौपचारिक असा. (२) व्यक्‍तीच्या आवडीच्या विषयांची व प्रश्‍नांची चर्चा करा. (३) चर्चा साधी, मनोवेधक आणि शास्त्रवचनीय पातळीवर राखा. (४) प्रत्येक भेटीत, घरमालकाला वैयक्‍तिकरित्या मोलाचे वाटेल असे काही शिकविण्याचा प्रयत्न करा. (५) पुढील भेटीत चर्चा केल्या जाणाऱ्‍या विषयाबद्दल उत्सुकता जागृत करा. (६) घरमालकाचा जास्त वेळ घेऊ नका. (७) गोंधळात किंवा अडचणीत टाकणारे प्रश्‍न त्याला विचारू नका. (८) समजबुद्धी बाळगा; घरमालकाची आध्यात्मिक कृतज्ञता विकसित होते त्यापूर्वी त्याच्या चुकीच्या मतांबद्दल किंवा वाईट सवयींबद्दल नापसंती दाखवू नका.—पुनर्भेटी करण्यात व बायबल अभ्यास सुरू करण्यात यशस्वी कसे व्हावे यावरील अधिक मदतीसाठी मार्च १९९७ ची आमची राज्य सेवा पुरवणी पाहा.

९ प्रत्येक संभावना शोधून काढा: एका मंडळीत, कडेकोट सुरक्षा असलेल्या एका सोसायटीतील प्रत्येक घरमालकाचे नाव आणि फ्लॅट नंबर मिळविणे शक्य झाले. प्रत्येक घरमालकाला एक वैयक्‍तिक पत्र लिहून त्यासोबत दोन हस्तपत्रिका देखील पाठविल्या गेल्या. पत्राच्या शेवटी, गृह बायबल अभ्यासाचा प्रस्ताव मांडला गेला; शिवाय एक स्थानिक फोन नंबर देखील दिला जेणेकरून घरमालक प्रत्युत्तर देऊ शकेल. काही दिवसांतच, एका तरुणाने फोन करून अभ्यासाची मागणी केली. दुसऱ्‍या दिवशी पुनर्भेट करण्यात आली आणि ज्ञान पुस्तकातून अभ्यासही सुरू करण्यात आला. त्याच दिवशी संध्याकाळी तो तरुण, मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला उपस्थित राहिला आणि पुढे सर्व सभांना तो उपस्थित राहू लागला. नियमितपणे बायबल वाचन करण्यासही त्याने लागलीच सुरवात केली. आणि खंड न पाडता त्याने बाप्तिस्म्याप्रत प्रगती केली.

१० प्रचारकांच्या एका गटाने एकत्र मिळून काही पुनर्भेटी करण्याची योजना आखली. एका बहिणीने एक पुनर्भेट केली तेव्हा ती भेटू इच्छित असलेली व्यक्‍ती घरात नव्हती; पण दुसरीच एक तरुणी समोर आली आणि म्हणाली: “मी तुमचीच वाट पाहत होते.” या घरमालकिणीला एका परिचितांकडून आधीच ज्ञान पुस्तक मिळाले होते. बहिणींनी तिची पुन्हा भेट घेतली तेव्हापर्यंत तिने दोन वेळा ते पुस्तक संपूर्ण वाचून काढले होते आणि त्यातील माहितीने ती अतिशय प्रभावित झाली होती. ती म्हणाली, की त्या दिवशी साक्षीदारांनी तिची भेट घेतली तेव्हा तिला मुळीच आश्‍चर्य वाटले नव्हते, कारण त्यांनी येऊन आपल्यासोबत बायबलचा अभ्यास करावा अशी ती सतत प्रार्थना करत होती. एक अभ्यास सुरू झाला, ती मंडळीच्या सभांना उपस्थित राहू लागली आणि तिने जलदगतीने प्रगती केली.

११ जवळजवळ २५ वर्षांपूर्वी बाप्तिस्मा झालेल्या एका बहिणीने अलीकडेच आपल्या आईला ज्ञान पुस्तक दिले. चर्चची सदस्य असलेली तिची आई ते पुस्तक वाचू लागली. दोन अध्याय वाचून झाल्यावर तिने आपल्या मुलीला फोन केला व आश्‍चर्य म्हणजे ती म्हणाली: “मला यहोवाची साक्षीदार बनायचंय!” ती अभ्यास करू लागली आणि आता तिचा बाप्तिस्मा झाला आहे.

१२ या सूचनांचा अवलंब करून पाहा: बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी तुम्ही कधी एका थेट प्रस्तुतीचा उपयोग केला आहे का? तुम्ही केवळ असे म्हणू शकता: “तुम्हाला जर एक मोफत गृह बायबल अभ्यास हवा असेल तर तो कसा केला जातो ते मी काही मिनिटांतच तुम्हाला दाखवू शकतो. तुम्हाला जर आवडला तर तुम्ही तो पुढे चालू ठेवू शकता.” असे बोलले जाते तेव्हा पुष्कळ लोक तो प्रस्ताव स्वीकारण्यास कचरत नाहीत, तर उलट बायबल अभ्यासाच्या प्रात्यक्षिकाचे ते निरीक्षण करतात.

१३ अभ्यास प्रस्थापित करताना, उल्लेखित शास्त्रवचने वाचून व छापील प्रश्‍नांची उत्तरे देणारे मुख्य शब्द अधोरेखित करून पूर्वतयारी कशी केली जावी ते विद्यार्थ्याला दाखवा. केवळ मुख्य मुद्द्‌यांवर लक्ष केंद्रित करा. पहिल्या काही सत्रांदरम्यान लवचीक असणे गरजेचे असले तरीही नियमितपणे बायबल अभ्यास करणे महत्त्वपूर्ण आहे. अभ्यासाचा एक अत्यावश्‍यक भाग म्हणून तुम्ही पहिल्या वेळी प्रार्थनेचा विषय कसा सांगाल आणि विरोधासाठी विद्यार्थ्याची शास्त्रवचनीयदृष्ट्या तयारी कशी कराल हे लक्षात असू द्या. सर्वार्थाने अभ्यास मनोरंजक बनवा.

१४ अर्थात, प्रत्येक बायबल विद्यार्थी एकाच गतीने प्रगती करतो असे नाही. आध्यात्मिकतेकडे इतरांचा कल असतो तसा काहींचा नसेल किंवा शिकवल्या जात असलेल्या गोष्टींची त्यांची ग्रहणशक्‍ती देखील इतरांएवढी तीक्ष्ण नसेल. इतरांचे जीवन अतिशय व्यस्त असल्यामुळे प्रत्येक आठवडी एक संपूर्ण अध्याय उरकण्याइतका वेळ कदाचित त्यांच्यापाशी नसेल. यास्तव, काही प्रकरणांत विशिष्ट अध्याय उरकण्यासाठी कदाचित एकाहून अधिक सत्रे घेण्याची गरज असेल व संपूर्ण पुस्तक उरकण्यासाठी आणखीन काही महिने लागतील. काही वेळा, आपण आधी अपेक्षा माहितीपत्रकाचा आणि मग ज्ञान पुस्तकाचा कदाचित अभ्यास करू; इतर वेळा, ज्ञान पुस्तकाचा अभ्यास उरकल्यानंतर अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास करणे उचित असल्याचे आपल्याला आढळेल. याच्या जोडीला मंडळीच्या सभांची उपस्थिती असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला सत्यात एक अढळ पाया घालण्यास मदत मिळेल.

१५ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बायबल अभ्यासासाठी प्रार्थना करा! (१ योहा. ३:२२) येशू ख्रिस्ताचा शिष्य बनण्यास एखाद्याची मदत करण्यात यहोवामार्फत उपयोग केले जाणे हा एका ख्रिश्‍चनासाठी असणारा सर्वात फलदायी अनुभव होय. (प्रे. कृत्ये २०:३५; १ करिंथ. ३:६-९; १ थेस्सलनी. २:८) बायबल अभ्यासाच्या कार्यात जाज्वल्य आवेश दाखविण्याची हीच वेळ आहे; आणि आणखीन अभ्यास सुरू करण्याच्या आपल्या प्रयत्नांवरील यहोवाच्या समृद्ध आशीर्वादांसंबंधी आपण विश्‍वस्त असू शकतो!

[Blurb on page 3]

बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा