विश्वासूपणाला प्रतिफळ मिळते
१ इब्री लोकांस ११:६ येथे देवाचा “शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे” असे सांगण्यात येते. “थोडक्या गोष्टीत विश्वासू” असलेल्या आपल्या भक्तांना ‘पुष्कळ गोष्टींवर नेमणे’ हा प्रतिफळ देण्याचा त्याचा एक मार्ग आहे. (मत्त. २५:२३) दुसऱ्या शब्दांत मांडायचे झाल्यास, आपल्या विश्वासू साक्षीदारांना सेवेचे जादा सुहक्क देऊन तो बहुधा परिश्रमी कार्याचे प्रतिफळ देतो.
२ प्रेषित पौलाला प्रतिफळ म्हणून अशी सेवा देण्यात आली ज्यामुळे त्याला युरोप आणि आशिया मायनरमधील शहरांमध्ये आणि गावांमध्ये जायला मिळाले. (१ तीम. १:१२, १३) आपली सेवा पूर्ण करण्यासाठी पौलाला पुष्कळ परिश्रम करावे लागले असले, तरी त्याला मिळालेल्या सुहक्कास त्याने मौल्यवान समजले. (रोम. ११:१३; कलस्सै. १:२५) प्रचार करण्यासाठी मनःपूर्वकतेने संधी शोधून त्याने अंतःकरणापासून गुणग्राहकता प्रदर्शित केली. आपल्या आवेशी कार्यांद्वारे त्याने स्पष्टरित्या दाखवून दिले की, तो आपल्या विश्वासानुरूप जगत होता. त्याचे उदाहरण आपल्याला सेवेचे सुहक्क जपून ठेवायला प्रवृत्त करते.
३ यहोवाने आपल्याला सेवा दिली आहे: या सुहक्काच्या प्रतिफळाबद्दल आपणही कशाप्रकारे पौलाप्रमाणे मनोवृत्ती दर्शवतो? सेवेत आपला सहभाग वाढवण्याचा मार्ग आपण शोधतो. अनौपचारिकरित्या त्याचप्रमाणे दारोदारी साक्ष देण्याची कोणतीही संधी आपण निसटू देत नाही. घरी नसलेल्या सर्वांचा आपण मागोवा घेतो आणि सर्व आस्थेवाईकांना पुनर्भेटी देतो. त्याचप्रमाणे गृह बायबल अभ्यास घेण्याविषयी दिलेल्या वेळा आपण पाळतो.
४ आपल्या सेवेबद्दल पौलाने उत्तेजन दिले: “तयार राहा.” (२ तीम. ४:२) जी गोष्ट निकडीची असते तिच्याकडे तत्परतेने लक्ष द्यावे लागते. आपण आपली सेवा निकडीने पार पाडतो आणि तिला आपल्या जीवनात प्रथम स्थान देतो का? उदाहरणार्थ, क्षेत्र सेवेला जो वेळ दिला जाण्यास हवा त्यामध्ये आपण सप्ताहांताच्या करमणुकीच्या कार्यहालचाली आणि वैयक्तिक कामे आड येऊ देणार नाही. या व्यवस्थीकरणाचा अंत जवळ आला आहे याची आपल्याला खात्री पटल्यामुळे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे कार्य आहे याचीही खात्री आपल्याला पटली आहे.
५ देवाप्रती आपण सत्य आणि एकनिष्ठ राहिल्याने व त्याने आपल्याला नेमून दिलेले कार्य नित्याने करत राहिल्याने देवाप्रती आपला विश्वासूपणा प्रदर्शित होतो. आपण आपली सेवा पूर्णपणे साध्य करू या जेणेकरून यहोवा आपल्या विश्वासूपणाचे मोठे प्रतिफळ देईल.