वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९७ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९७
आमची राज्य सेवा—१९९७
km २/९७ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता

फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना) किंवा तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. पर्यायी सादरता म्हणून १९२ पृष्ठांची कोणतीही जुनी पुस्तके खास सादरता म्हणून १०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात.

मार्च: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात.

एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांच्या वर्गण्या.

सूचना: कौटुंबिक जीवन व अनंतकाल जगू शकाल पुस्तकांचा चांगला उपयोग करीत राहावा असे आम्ही सर्व मंडळींना उत्तेजन देतो. प्रचारकांना या पुस्तकांच्या प्रती वर्षभरात सर्ववेळी आपल्यासोबत ठेवण्यास व प्रत्येक प्रसंगी त्यांना सादर करण्याचे उत्तेजन दिले जाऊ शकते. वर उल्लेखलेल्या कोणत्याही मोहिम सादरतांची मागणी ज्या मंडळ्यांनी अद्याप केलेली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-AB-14) वर मागणी पाठवावी.

◼ सचिव आणि सेवा पर्यवेक्षकांनी सर्व नियमित पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. जर कोणाला तास भरण्यात समस्या असेल, तर वडिलांना त्यांना मदत देण्याची व्यवस्था करावी. सूचनांकरता, संस्थेने पाठवलेल्या ऑक्टोबर १, १९९३ व ऑक्टोबर १, १९९२ पत्रांची (S-201) उजळणी करा. तसेच, ऑक्टोबर १९८६ च्या आमची राज्य सेवा पुरवणीतील १२-२० परिच्छेद पाहा.

◼ मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान सहायक पायनियरींग करू इच्छिणाऱ्‍या प्रचारकांनी आताच योजना कराव्यात व होता होईल तितक्या लवकर आपले अर्ज द्यावेत. यामुळे वडिलांना क्षेत्र सेवेच्या आवश्‍यक योजना करण्यास व पुरेशी नियतकालिके व साहित्य तयार ठेवण्यास मदत होईल. सहायक पायनियर म्हणून ज्यांना स्वीकृती मिळाली त्या सर्वांची नावे मंडळीत घोषित केली जावीत.

◼ मंडळी जेव्हा स्थानीय संमेलनांना उपस्थित राहते तेव्हा पुढील फेरफारांची गरज आहे याची वडील वर्गाला जाणीव असली पाहिजे: खास संमेलन दिवस कार्यक्रम आयोजित केला जातो तेव्हा जाहीर सभा आणि टेहळणी बुरूज अभ्यास याखेरीज मंडळीने संपूर्ण आठवड्यात नेहमीप्रमाणे सभा घ्याव्यात. विभागीय संमेलनाला उपस्थित राहावे लागते तेव्हा मंडळी ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा देखील रद्द करील; फक्‍त आठवड्यादरम्यान मंडळीचा पुस्तक अभ्यास स्थानीयरीत्या घेतला जाईल.

◼ जानेवारीपासून नेपाळी भाषेत सावध राहा! हे प्रत्येक महिन्याला प्रकाशित करण्यात येईल त्याचा पहिला अंक जानेवारी ८, १९९७ हा असेल. त्याची वार्षिक वर्गणी ४५.०० रूपये असेल.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! —आसामी, तिबेटी

शांतीदायक नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५) —झाँखा

कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य —इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, मराठी, मल्याळम, हिंदी

(हे पुस्तक प्रचारकांसाठी व जनतेसाठी २०.०० रुपयांना तर पायनियरांसाठी १२.०० रुपयांना.)

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —आसामी, इंग्रजी, ओरिया, कन्‍नड, कोकणी (देवनागरी, कन्‍नड आणि इंग्रजी लिपीत वेगवेगळे उपलब्ध), खासी, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मणिपुरी, मराठी, मल्याळम, मिझो, हिंदी

(हे माहितीपत्रक प्रचारक आणि जनता यांच्यासाठी ६.०० रुपयांना तर पायनियरांसाठी ४.०० रुपयांना.)

तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल (लहान आकाराचे) —पंजाबी

◼ नवीन ऑडिओकॅसेट उपलब्ध:

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? (एक कॅसेट) —कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम, हिंदी

(ह्‍या कॅसेट्‌स प्रचारकांसाठी व जनतेसाठी ६५.०० रुपयांना तर पायनियरांसाठी ५५.०० रुपयांना आहेत.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा