खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
१ या महिन्यात सुरु होणाऱ्या खास संमेलन दिवसाच्या नवीन कार्यक्रमाचा विषय, “यहोवाकडून शिक्षण पावलेले लोक व्हा” हा आहे. (योहा. ६:४५) यहोवाकडून येणारे ईश्वरी शिक्षण समाधानकारक जीवन व्यतीत करण्यास खरोखरीच मदत करते. ते आपल्यामध्ये आपल्या आध्यात्मिक वारशाबद्दल तीव्र कृतज्ञता उत्पन्न करते. इतरांनीही सुवार्ता ऐकावी म्हणून आपण जो प्रयत्न करतो त्यामुळे आपण समाजाचे उपयोगी सदस्य बनतो. हा खास संमेलन दिन, यहोवाकडून शिक्षण पावलेले लोक उपभोगत असलेल्या आशीर्वादांवर जोर देईल.
२ हा कार्यक्रम ईश्वरी शिक्षणाचे फायदे आणि जगीक शिक्षणाचे धोके यांच्यातील विषमता दाखवील. यहोवा सर्वोच्च दर्जाचे शिक्षण—आपले वचन, बायबलवर आधारित शिक्षण कसे देतो ते अधिक स्पष्टपणे आपण पाहणार आहोत. यहोवाकडून शिक्षण घेतल्यामुळे आपण ज्या आनंदाचा अनुभव घेत आहोत अशा उपासनेच्या तीन पैलूंवर जोर दिला जाईल. यासोबत, तरुणांना दावीद आणि तीमथ्य यासारख्या उल्लेखनीय बायबल उदाहरणांचे अनुकरण करण्यास तसेच आध्यात्मिक कार्यांभोवती आपले जीवन विकसित करण्यास उत्तेजन दिले जाईल. वृद्ध जनांच्या एकनिष्ठेवर जोर दिला जाईल तेव्हा देखील आपला विश्वास आणखी बळकट होईल. पात्र असलेल्या नवीन समर्पितांनाही बाप्तिस्मा घेता येईल. अशांनी, संमेलन दिवसाच्या बऱ्याच दिवसांआधी त्यांची ही इच्छा अध्यक्षीय पर्यवेक्षकांना सांगितली पाहिजे.
३ खास संमेलन दिवसाच्या मुख्य भाषणाचा विषय आहे, “यहोवाची इच्छा आचरण्यासाठी त्याच्याकडून शिक्षण पावलेले.” आपण सर्वांनी शिकत का राहावे, विश्वासात दृढ का राहावे व प्रगती का करीत राहावी या कारणांवर जोर देण्यात येईल. सार्वकालिक जीवनाकडे नेणारे सत्य इतरांना शिकवण्याद्वारे यहोवाचे अनुकरण करण्यास आपल्याला आर्जवले जाईल. संस्थेच्या प्रकाशनांनी कशाप्रकारे अनेकांना यहोवाकडून शिक्षण घेण्यास मदत केली ते दाखवण्यासाठी उभारणीकारक अनुभव देखील असतील. यहोवाच्या विश्वव्यापी शैक्षणिक कार्यक्रमाच्या लाभदायक साध्यता ठळक केल्या जातील.
४ उपस्थित राहण्याकरता निश्चित योजना करा. सर्व आस्थेवाईकांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन द्या. आपला महान शिक्षक याच्याकडून पुष्कळ भल्या गोष्टी शिकून घेण्याची वाट पाहा.—यश. ३०:२०.