वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९६ पृ. ३
  • सध्या उपलब्ध असलेले साहित्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सध्या उपलब्ध असलेले साहित्य
  • आमची राज्य सेवा—१९९६
आमची राज्य सेवा—१९९६
km ७/९६ पृ. ३

सध्या उपलब्ध असलेले साहित्य

इतक्या वर्षांदरम्यान, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ आपल्याला क्षेत्रात वापरण्यासाठी सुंदर साहित्य पुरवले आहे. हे खरोखरच ‘यथाकाळचे अन्‍न’ शाबीत झाले आहे व या प्रकाशनांद्वारे लाखो लोकांना सत्याचे अचूक ज्ञान प्राप्त करण्यास मदत दिली जात आहे. (मत्त. २४:४५) प्रत्येक महिन्याला आमची राज्य सेवा यात सुचवलेली सादरता अनुसरणे उत्तम असले, तरी घरमालकांच्या गरजांनुसार प्रचारक आपल्यासोबत सादर करण्यासाठी इतर साहित्य नेऊ शकतात. आपल्याजवळ पुरेसा साठा असलेल्या पुस्तकांची यादी खाली देण्यात आली आहे व सर्व मंडळ्यांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्‍या भाषांमध्ये यातील निदान काही साहित्य उचित प्रमाणात मागवावे असे उत्तेजन आम्ही देत आहोत. प्रचारकांनी आपल्या व्यक्‍तिगत ग्रंथालयांकरता, बायबल अभ्यास व पुनर्भेटींना सादर करण्याकरता व व्यावहारिक असेल तेथे दारोदारच्या सेवेत सोबत नेण्याकरता ते घ्यावेत म्हणून त्यांना उत्तेजन दिले जाते.

चर्चेसाठी पवित्र शास्त्र विषय, कन्‍नड, गुजराती, बंगाली व मराठी; रक्‍त तुमचे जीवन कसे वाचवू शकते, इंग्रजी, कन्‍नड, तमीळ, तेलगू, मल्याळम, मराठी व हिंदी; विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार, इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तमीळ, तेलगू, बंगाली, मल्याळम, मराठी व हिंदी; यहोवाचे साक्षीदार—जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत, इंग्रजी, गुजराती, तमीळ, तेलगू, नेपाळी, मल्याळम, मराठी व हिंदी; “तुझे राज्य येवो,” इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तमीळ, मराठी व हिंदी; तरुण लोक विचारत असलेले प्रश्‍न—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी) आणि तुमचे तारुण्य—त्यापासून सर्वोत्तम लाभ मिळवणे (इंग्रजी), तमीळ व मल्याळम; तुम्ही त्रैक्य मानावे का?, इंग्रजी, कन्‍नड, कोंकणी (दोन्ही कन्‍नड व रोमन लिपीत), गुजराती, तमीळ, तेलगू, बंगाली, मल्याळम, मराठी, मीझो व हिंदी; एकमेव खऱ्‍या देवाच्या उपासनेतील ऐक्य, तमीळ, नेपाळी, मल्याळम व मराठी; तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, इंग्रजी (मोठ्या आकाराचे), गुजराती, बंगाली व मराठी. महिन्याची सादरता असलेल्या नियमितरित्या वापरल्या जाणाऱ्‍या बहुतांश भाषांमधील माहितीपत्रकांचा आमच्याजवळ पुरेसा साठा देखील उपलब्ध आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा