जिवेभावे असा!
यहोवाचे आभार मानण्यासाठी आपल्याकडे अनेक कारणे आहेत. यामध्ये, त्याने आपल्यासाठी गतकाळात केलेल्या, सध्या करत असलेल्या आणि भवितव्यात करणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो. आपल्या कृतज्ञतेने आपल्याला काय करण्यास प्रवृत्त केले पाहिजे? दावीदाचे एक स्तोत्र त्याचे उत्तर देते: “परमेश्वराचा [यहोवाचा, NW] धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.”—स्तोत्र ३४:१.
२ आपल्याला प्रचार करण्याची आज्ञा देण्यात आल्याचे बायबल स्पष्टपणे दाखवते. हे असे कार्य आहे जे आपण “प्रभूसाठी [यहोवा] म्हणून जिवेभावे” करतो. (कल. ३:२३) आपण खरोखरच जिवाभावाने सेवा करत असलो तर केवढ्या प्रमाणात सेवा करू? यहोवाने आपल्यासाठी दाखवलेल्या प्रीतीचा आपण विचार करतो तेव्हा, निश्चितच आपले अंतःकरण आपल्याला त्याच्याविषयी आणि त्याच्या मौल्यवान उद्देशांविषयी इतरांना सांगण्यात तत्परतेने भाग घेण्यास प्रवृत्त करते! आपल्याला होता होईल तितके करण्याची प्रेरणा मिळते.
३ जिवाभावाने सेवा करणाऱ्या मनुष्याला आपले लक्ष पवित्र सेवेवर केंद्रीत करण्यास आवडते अशी त्याच्याकडून अपेक्षा करणे तर्कशुद्ध आहे. अशाच प्रकारच्या भावना असलेल्या स्तोत्रकर्त्याने घोषित केले: “मी दिवसातून सात वेळा तुझे स्तवन करितो.” (स्तोत्र ११९:१६४) स्तोत्रकर्त्याप्रमाणेच भावना असणारे, यहोवाची स्तुती करण्याच्या संधींचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या परिस्थिती त्यांना अनुमती देतात त्याप्रमाणे शक्य असेल तेवढ्या आवेशाने सेवा करतात.
४ यहोवाची स्तुती करण्याच्या संधींनी व्याप्त आहोत: सुवार्तेचा प्रचार केवळ दारोदारी करेपर्यंत आपल्याला थांबून राहण्याची गरज नाही. आपले सहकर्मचारी, शाळासोबती, नातेवाईक आणि परिचयाचे लोक, या सर्वांनी सुवार्ता ऐकण्याची गरज आहे. प्रवास करताना आपण संभाषणास सुरवात करू शकतो ज्यामुळे कदाचित, हॉटेलचे कर्मचारी, भोजनगृहातील कामगार, सर्विस केंद्र किंवा रिक्शा व टॅक्सी चालकांना साक्ष दिली जाईल. घरी असताना, आपण शेजाऱ्यांना किंवा सामान पोस्त करणाऱ्यांना साक्ष देऊ शकतो. आपण इस्पितळात असलो तर तेथे परिचारिका, डॉक्टर आणि इतर रुग्ण असतात ज्यांना आपण अनौपचारीकरीत्या प्रचार करू शकतो.
५ अनौपचारीक साक्षकार्यामुळे प्रतिफळ मिळते: एके दिवशी, दोन साक्षीदार बागेत फेरफटका मारत असताना त्यांचे संभाषण, आपल्या मुलाबरोबर फिरायला आलेल्या एका तरुणासोबत सुरू झाले. कालांतराने त्याने व त्याच्या पत्नीने सत्य स्वीकारले. त्या तरुण मनुष्याने नंतर सांगितले, की त्या दोन साक्षीदारांना पहिल्यांदा भेटण्याच्या थोड्या वेळाआधीच त्याने देवाला, ‘तू जर अस्तित्वात आहेस तर मला तुझ्याबद्दलची ओळख होऊ दे,’ अशी प्रार्थना केली होती. बागेमध्ये साक्षीदारांबरोबर झालेली भेट यहोवाकडील उत्तर असल्याचे त्याला वाटते.
६ इतरांना जिवाभावाने आध्यात्मिकरीत्या मदत करण्याची इच्छा असलेले मोठा आनंद अनुभवतात. त्यांना माहीत आहे, की अशा प्रकारची ‘मनोभावाची’ सेवा, यहोवास संतुष्ट करते.—१ इति. २८:९.