पंजाबीमध्ये टेहळणी बुरुज
ऑगस्ट १, १९९५ पासून संस्था पंजाबीमध्ये टेहळणी बुरुज प्राकाशित करणार असल्याची घोषणा करण्यास आम्हाला आनंद होतो.
टेहळणी बुरुज नियतकालिक, पंजाबी भाषेत पेहेराबुरूज या नावाने मासिक म्हणून प्राकाशित होत आहे. मंडळ्या या नियतकालिकासाठी वितरकांच्या मागण्या तत्काळ करू शकतात आणि प्राचारक आतापासूनच या नियतकालिकाच्या वर्गण्या मिळवू शकतात. सर्व मासिक आवृत्त्यांप्रामाणेच, एका-वर्षाच्या वर्गणीचे अनुदान ३५ रुपये आहे, परंतु याची सहा महिन्यांची वर्गणी उपलब्ध नसेल. किरकोळ प्राती प्रात्येकी ३.०० रुपयांना आहेत.
ऑगस्ट १ चा अंक काहीसा प्रायोग अंकासमान असल्यामुळे, त्यामधील अभ्यासाचे लेख काही महिन्यांआधी टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या इंग्रजी तसेच भारतीय भाषेतील आवृत्त्यांमधील लेख आहेत व म्हणून त्यांचा अभ्यास आधीच झालेला असेल. सप्टेंबर १, १९९५ पासून, पेहेराबुरूज मधील अभ्यासाचे लेख इतर आवृत्त्यांमध्ये आखल्याप्रामाणेच असतील (प्रात्येक पेहेराबुरूज मध्ये चार ते पाच अभ्यासाचे लेख असतील). यास्तव, पेहेराबुरूज नियतकालिकाचा उपयोग करू इच्छिणाऱ्या मंडळ्या व व्यक्ती ऑक्टोबर ९, १९९५ ने सुरू होणाऱ्या सप्ताहापासून आपल्या मंडळीत टेहळणी बुरुज अभ्यासासाठी, त्याचा उपयोग करू शकतील.
त्या दरम्यान, तुमच्या वितरकांच्या मागण्या देण्यास त्याचप्रामाणे पेहेराबुरूज नियतकालिकाच्या वर्गण्या मिळवण्यास आम्ही तुम्हाला सकारात्मक असण्याचे उत्तेजन देतो. टेहळणी बुरुज, यहोवाच्या राज्याकरवी साध्य होणाऱ्या मानवाच्या तारणाचा संदेश देत असल्यामुळे ते एक जीवन-प्रादायक नियतकालिक आहे. भारतामध्ये टेहळणी बुरुज नियतकालिक दहाव्या भाषेत भाषांतरीत होत आहे व ही अद्भुत तरतूद केल्याबद्दल आपण यहोवाचे आभार मानतो. क्षेत्रामध्ये तसेच बांधवांची उभारणी करण्यात व त्यांची प्रौढतेप्रात वाढ करण्यास मदत करण्यामध्ये हे एक शक्तिशाली साधन ठरेल अशी प्रार्थना आम्ही करतो. त्याचा पूर्णपणे उपयोग करण्यास तुम्ही आनंदी असाल अशी आम्हाला खात्री आहे आणि तसे करत असताना तुम्हाला भरपूर आशीर्वाद प्राप्त होवो.