वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९५ पृ. ३
  • इतरांचा विचार करा—भाग १

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांचा विचार करा—भाग १
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य सभागृहाची ओळख
    आमची राज्य सेवा—१९९०
  • आपण आपले उपासनेचे ठिकाण सुस्थितीत ठेवू या
    आमची राज्य सेवा—२००३
  • मे सेवा अहवाल
    आमची राज्य सेवा—१९९७
  • फिरते देखरेखे सत्यातील सहकारी
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km १/९५ पृ. ३

इतरांचा विचार करा—भाग १

१ यहोवाच्या लोकांची वाढ पाहण्यात आम्हाला आनंद वाटतो, ती मंडळ्यांच्या वाढत्या संख्येत परिणामित झाली आहे. काही शहरांमध्ये, पुष्कळ मंडळ्यांना एकच राज्य सभागृह वापरावे लागते. यास्तव, गोवलेल्या सर्वजणांना अधिक विचार करण्याची गरज आहे.

२ राज्य सभागृह वापरणाऱ्‍या प्रत्येक मंडळीने नंतर येणाऱ्‍या बांधवांसाठी ते नीट आणि व्यवस्थित ठेवले पाहिजे. खुर्च्या व्यवस्थितपणे ठेवल्या पाहिजेत, काउन्टरवरील कोणतेही साहित्य उचित ठिकाणी ठेवावे आणि राज्य सभागृहात इकडेतिकडे ठेवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्‍तिगत वस्तू घेतल्या जाव्यात. शौचालये साफ आणि स्वच्छ ठेवावीत आणि साबण, टॉवेल किंवा इतर वस्तू पुन्हा ठेवल्या आहेत आणि कचऱ्‍याच्या पेट्या मोकळ्या केल्या आहेत याची खात्री केली जावी. एकच मंडळी राज्य सभागृह वापरत असली, तरी हे करणे चांगले असेल. पुष्कळ मंडळ्यांना पुष्कळशी स्वच्छता आणि सफाई सभांच्या नंतर करण्यासाठी आराखडा करण्यास बरे वाटते. ते पुढील सभेच्या आधी केवळ झाडून घेणे आणि धूळ पुसून काढण्याची क्षुल्लक कामे ठेवतात. सर्वचजण पुरेशा वेळेआधी सभागृह चांगल्यारीतीने साफ करण्यासाठी येऊ शकत नाहीत आणि सभा सुरु होण्याच्या कमीतकमी २० मिनिटे आधी ते नीटनेटके ठेवू शकत नाहीत यासाठी सभेच्या आधी पुष्कळशी स्वच्छता करण्याचा आराखडा करण्याऐवजी त्यांना हे अधिक बरे वाटते. त्याशिवाय, उपस्थित राहणाऱ्‍यांना स्वतः नीटनेटके असण्याची इच्छा असते विशेषतः कार्यक्रमात भाग असणाऱ्‍यांना सभेच्या आधी पूर्ण सफाई करण्याची इच्छा नसेल.

३ त्याच वेळी, दुसऱ्‍या मंडळीची सभा त्यानंतर लगेचच सुरू होण्यास योजली असेल, तर सुरवातीच्या सभेला उपस्थित राहणाऱ्‍यांनी अनावश्‍यकपणे तेथे थांबून पुढील सभेच्या तयारीमध्ये अडथळा आणू नये. अधिक वेळ आपसातील संभाषण करीत राहिल्याने वाटेत गर्दी होते आणि त्यामुळे पुढील सभेसाठी गोष्टींची व्यवस्था करण्यास बांधवांना उशीर होऊ शकतो. काही बाबतींमध्ये, राज्य सभागृहाजवळ वाहने उभी करण्याची जागा मर्यादित असल्यामुळे, लगेचच निघून जाणे चांगले असेल जेणेकरून आत येणाऱ्‍यांना वाहने उभी करण्यासाठी जागा मिळू शकते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, दुसऱ्‍या सभेला येणाऱ्‍यांनी खूप लवकर येऊ नये आणि सभागृहाच्या वाटेत किंवा वस्तुगृह आणि वाहने उभी करण्याच्या जागेत अनावश्‍यक गर्दी करू नये.

४ पुष्कळ मंडळ्या समाविष्ट आहेत तेथे, राज्य सभागृहाच्या साप्ताहिक स्वच्छतेच्या योजना करण्यात चांगला सहयोग देण्याची खास गरज आहे. सामान्यतः, नेमलेल्या कालावधीसाठी मंडळ्या आळीपाळीने हे करतात. तुमच्या मंडळीची ती जबाबदारी असते तेव्हा, स्वच्छता पूर्णपणे आणि लवकर केली जाते याची खात्री करा. त्यामुळे सभागृह वापरणाऱ्‍या इतर मंडळ्यांना तक्रार करण्यासाठी वाव मिळणार नाही.

५ काहीवेळा, प्रत्येक मंडळीला, जसे विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान आपल्या सभांच्या वेळा बदलण्याची गरज भासते. इतर मंडळीवर याचा परिणाम होत असल्यास, वडिलांनी दुसऱ्‍या मंडळीला आगाऊ सूचना द्यावी जेणेकरून ते लवकरात लवकर त्यांच्या प्रचारकांना कळवू शकतील. तसेच, कोणतीही अधिकृत कार्यहालचाल जसे, पायनियर सेवा प्रशाला, विभागातील वडिलांची सभा किंवा एखादे लग्न सभारंभ आयोजित केले असल्यास, परिणाम होणाऱ्‍या इतर मंडळ्यांना आणि विभागीय पर्यवेक्षकांना आगाऊ कळवावे; अशाप्रकारे, ते त्याच वेळी राज्य सभागृहाचा वापर करण्याची योजना करणार नाहीत.

६ इतरांबद्दल प्रेमळ कदर, चांगले दळणवळण, आगाऊ योजना आणि सहयोग, मंडळ्यांमध्ये एक उबदार नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करील आणि “सर्वकाही शिस्तवार आणि व्यवस्थितपणे” पार पडण्याची खात्री देईल.—१ करिंथ. १४:४०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा