वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९४ पृ. ३
  • क्षेत्र सेवेसाठी अर्थपूर्ण सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र सेवेसाठी अर्थपूर्ण सभा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • उद्देश साध्य करणाऱ्‍या क्षेत्र सेवेच्या सभा
    आपली राज्य सेवा—२०१५
  • क्षेत्र सेवाकार्याच्या सभांचा पूर्ण फायदा घ्या
    आमची राज्य सेवा—२००६
  • मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था भाग ३: क्षेत्र कार्याचे केंद्र
    आमची राज्य सेवा—१९९१
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२००१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ६/९४ पृ. ३

क्षेत्र सेवेसाठी अर्थपूर्ण सभा

१ लूक १०:१-११ मध्ये, येशूने त्याच्या नव्यानेच नेमलेल्या ७० शिष्यांसमवेत एक सभा घेतल्याचा अहवाल आहे. ती सभा त्यांना क्षेत्र सेवेसाठी तयार करण्यात मदत करण्यासाठी घेतली होती. त्यांना संघटित होण्यात, ते काय बोलणार होते त्याची तयारी करण्यात व कठीण परिस्थितींचा सामना करण्यात मदत करण्यासाठी त्याने विशिष्ट मार्गदर्शन पुरवले. आम्ही या अहवालाचे परीक्षण करून शिकू शकतो.

२ स्पष्टतः, येशूसोबत त्याचे सर्व ७० शिष्य त्या सभेसाठी उपस्थित होते. काही व्यक्‍ती त्यांच्या सवयींमुळे उशीराच येत असतील तर, सेवेच्या सभांमध्ये बराच वेळ वाया घालवला जातो. त्यांच्या उशीरा येण्यामुळे, बहुधा गटांमध्ये तसेच क्षेत्राच्या नेमणूकींमध्ये बदल करणे आवश्‍यक होते. त्यामुळे संपूर्ण गटाला उशीर होतो. वेळेवर हजर राहून व क्षेत्रात त्वरित जाण्यासाठी तयार राहून, आम्ही सर्वजण आपली भूमिका पार पाडू शकतो.

३ येशूने त्या गटाला, “देवाचे राज्य” हा विशिष्ट संभाषणाचा विषय वापरण्यासाठी दिला. (लूक १०:९) आम्हाला तोच संदेश सांगण्यासाठी नेमण्यात आले आहे. काय बोलावे त्याबद्दल काही मदतदायी सूचनांची आम्ही बहुधा गुणग्राहकता बाळगतो. चालक युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकाचा संदर्भ देतील. त्यामध्ये, ४० पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रस्तावना व विविध परिस्थितींमध्ये वापरता येतील अशी उचित शास्त्रवचने सादर केली आहेत. एक किंवा दोन सादरतांची संक्षिप्त उजळणी केल्याने आम्हाला काय बोलायचे त्याबद्दल मनात काही राखण्यासाठी मदत मिळते. ते आम्हाला दरवाज्यांवर अधिक आत्मविश्‍वासाने बोलण्यास मदत करील.

४ येशूने त्याच्या शिष्यांना काय बोलायचे एवढेच नव्हे तर, कसे बोलायचे तेही सांगितले. (लूक १०:५, ६) सेवा सभेच्या कार्यक्रमात दर्शवलेली प्रात्यक्षिके, आम्ही स्वतःला प्रभावकारीपणे कसे व्यक्‍त करू शकतो हे दाखवतात. मागच्या सभेत काय सादर केले गेले याची उजळणी चालक घेतील, व त्या दिवशी त्याचा क्षेत्रात वापर कसा केला जाऊ शकतो यावर काही सूचना देतील. एका साध्या शास्त्रवचनीय सादरतेच्या संक्षिप्त तयार केलेल्या प्रात्यक्षिकामुळे, आपल्या विचारांवर मनन करून त्यांना आमच्या शब्दांमध्ये घालण्यासाठी मदत मिळेल.

५ येशूने त्याच्या शिष्यांना त्यांच्या व्यक्‍तिगत वागणूकीबद्दलही सूचना दिल्या. (लूक १०:७, ८) त्याचप्रमाणे, आमच्या कार्यापासून विचलित करणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीला टाळण्यास मदत करण्यासाठी चालक आम्हाला स्पष्ट मार्गदर्शन देतील. रस्त्यांच्या कोपऱ्‍यांवर जमा होण्याबद्दल किंवा विरोधकांबरोबर वाद घालण्यात वेळ वाया घालवण्याबद्दल ते आम्हाला सावध करतील. ते आम्हाला एक अचूक घरोघरचे नोंदपत्रक ठेवण्याच्या गरजेबद्दल आठवण करून देतील. ते आम्हाला घरमालकाचे नाव व पत्ताच नव्हे तर, चर्चिलेल्या विषयाची नोंद घेण्यासाठी देखील आठवण करून देतील. पालकांना आपल्या मुलांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याबद्दल आठवण करून देण्याची आवश्‍यकता असेल.

६ त्या ७० शिष्यांनी येशूच्या सूचनांना सहयोग दिला व नंतर ‘आनंदाने परतले.’ (लूक १०:१७) आम्ही देखील सेवेच्या सभांमध्ये मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाला प्रतिसाद दिला तर, आम्ही देखील राज्य संदेशाचा प्रचार करताना अधिक आनंदाची अपेक्षा करू शकतो.—प्रे. कृत्ये १३:४८, ४९, ५२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा