धैर्याने परंतु चतुराईने प्रचार करणे
प्रेषित पौलाने तीमथ्यास “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने . . . [ते] कर,” असे आग्रहाने विनवले. तो म्हणाला, “कारण [लोक] सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत . . . अशी वेळ येईल.” (२ तीम. ४:२, ३, ४) या शेवटल्या काळच्या कठीण दिवसात आम्ही पुढे जात असताना, पवित्र शास्त्राच्या सुशिक्षणाप्रमाणे चालण्यासाठी अधिक व्यक्ती इच्छित नाहीत. कधीकधी, आम्ही त्यांना सादर करतो त्या सत्याकडे दुर्लक्ष करून ते ही मनोवृत्ती प्रदर्शित करतात, व वरील उतारा पुढे म्हणतो त्याप्रमाणे, ते “आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून . . . स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी,” जमवण्यास अधिक पसंत करतात. तरीसुद्धा इतर वेळी, आपली नेमणूक पूर्ण करण्यास आम्हाला कठीण बनवते अशाप्रकारे हट्टी होऊन, संयम न ठेवून आणि भयानक देखील होऊन ते भविष्यवाणीची पूर्णता करतात. आम्हाला हे कार्य करत राहायचे असल्यामुळे आणि “अवेळी” देखील निकडीने ते करायचे असल्यामुळे, आम्ही धैर्याने, परंतु चतुराईने प्रचार कसा करू शकतो?—२ तीम. ३:१-३.
२ यहोवाच्या सेवकांसाठी विरोध ही काही नवीन गोष्ट नाही. हाबेलला त्याच्या ईश्वरी भक्तीसाठी ठार मारण्यात आले त्या वेळेपासून, यहोवाच्या खऱ्या उपासकांनी सैतानाच्या लोकसमुदायाकडून छळ सहन केला आहे. तसेच, शास्त्रवचनात येशूच्या शिष्यांना छळले जाईल हे दाखवणाऱ्या पुष्कळ भविष्यवाण्या आहेत. (मत्त. २३:३४) विशेषकरून, या अंतिम काळात सैतान पृथ्वीच्या परिसरात असल्यामुळे व “आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त” झाल्यामुळे, तो गर्जणाऱ्या सिंहासारखा यहोवाच्या सेवकांचे मिळेल ते गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात असलेला आम्हास आढळतो. (१ पेत्र ५:८; प्रकटी. १२:१२) त्याच वेळी, परीक्षा घेणारे अनुभव आम्हाला येतील, याची जाणीव असली तरी, आम्हाला त्रास ओढवून घेण्यास किंवा अनावश्यकपणे स्वतःला छळासाठी हवाली करायचे नाही. त्यासाठीच, येशूने “सापासारखे चतुर” व विरोध करणाऱ्या “माणसांच्या बाबतीत जपून राहा,” असे विनवून सांगितले. आम्ही अशाप्रकारे कसे असू शकतो?—मत्त. १०:१६, १७.
३ येशूचे उदाहरण: विश्वातील प्रमुख सुवार्तिक या नात्याने, धैर्य आणि चतुरपणाच्या बाबतीत येशूने आम्हासमोर कोणते उदाहरण ठेवले? यहोवाच्या नियमाचा गैरफायदा घेऊन त्यास लाभ मिळवण्याचे माध्यम बनवणाऱ्या व्यापाऱ्यांना मंदिरातून घालवून देण्यासाठी त्याने शारीरिकरित्या कार्य केल्याच्या दोन घटना तुम्हाला आठवतात का? (योहान २:१३-१७; मत्त. २१:१२, १३. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील १६ आणि १०३ अध्याय पाहा.) आणि त्याने शास्त्री व परुश्यांना त्यांच्या ढोंगीपणासाठी आणि त्यांच्या उपासनेच्या अप्रामाणिकतेसाठी कित्येकदा धिक्कारले. कधीकधी दाखल्यांद्वारे आणि कधीकधी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगून त्याने तसे केले.—मत्त. १६:६, १२; अध्याय २३.
४ त्याचप्रमाणे आज, आम्हाला सेवेत धीट असण्याची गरज आहे. निश्चितच, शारीरिकपणे खोट्या भक्तीच्या साधनांचा नाश करण्यास किंवा अशा भक्तीत सहभाग घेणाऱ्या व्यक्तींचा धिक्कार करण्याचा आम्हाला अधिकार नाही, तरीसुद्धा, खोटेपणा काढून टाकण्यात आणि नाश करण्यात देवाचे वचन वापरण्यास आम्ही नेहमी तयारीत आहोत. (इफि. ६:१७; इब्री. ४:१२) आम्ही धैर्याने ही घोषणा करतो की, आत्म्याने आणि खरेपणाने यहोवाची सेवा करणे, हाच केवळ सार्वकालिक जीवन मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. आम्ही मनुष्यांना प्रसन्न करण्यासाठी देवाच्या संदेशाचे मूल्य कधीही कमी करत नाही, किंवा मिश्र विश्वासाच्या हालचालींमध्ये भाग घेऊन किंवा कोणत्याही मार्गी खोट्या भक्तीला पाठिंबा देऊन आमच्या विश्वासाची हातमिळवणी करत नाही. या धैर्यामुळे आम्ही बहुधा आमच्याशी असहमत असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात येतो. मग काय?
५ चतुर असणे: पुन्हा एकदा, आपण येशूच्या उदाहरणाकडे पाहू या. शब्बाथ दिवशी एका माणसाच्या वाळलेल्या हाताला येशू बरे करील का हे पाहण्यासाठी शास्त्री आणि परुशी येशूकडे दोषैकदृष्टीने पाहत होते याची त्याला जाणीव होती. ती घटना आठवा. येशूने धैर्याने त्या माणसाला सभास्थानाच्या “मध्ये” बोलावून बरे केले नाही का? परंतु त्यांचे “डोके फिरले” आणि ते त्याचा घात करावयास मसलत करू लागले हे येशूने ओळखले तेव्हा त्याने छळ सहन करण्यास इच्छिले पाहिजे असा तर्क करून तो तेथेच थांबला का? नाही! “येशू तेथून निघाला.”—मत्त. १२:१४-१७; लूक ६:६-११. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील अध्याय ३२ आणि ३३ देखील पाहा.
६ त्यानंतर, परुश्यांना, ते दियाबल त्यांचा पिता याजकडून होते हे सांगताना त्याने त्यांचा खंबीरपणे धिक्कार केला, ती वेळ तुम्हाला आठवते का? त्यांनी येशूला मारण्यासाठी दगड उचलले तेव्हा अभिमानाने तेथेच उभे राहून त्याने स्वतःवर दगडमार होऊ दिला नाही. त्याउलट, तो लपला आणि नंतर गुप्तपणे मंदिर सोडून गेला. (योहान ८:३७-५९) आणि त्याने यहोवासोबत त्याच्या संबंधाबद्दल जाहीरपणे घोषणा केली आणि यहुद्यांनी “त्याला दगडमार करावयास पुन्हा दगड उचलले,” त्या प्रसंगाबद्दल काय? त्याने त्यांच्याशी तर्क करण्यास पाहिले परंतु ते “त्याला पुन्हा धरावयास पाहू लागले” तेव्हा पळून जाण्यास त्याला कमी प्रतिष्ठेचे वाटले नाही, परंतु त्याने तसे केले आणि “त्यांच्या हाती न लागता निघून गेला.” वस्तुतः, त्याला त्या प्रसंगी तो प्रांतच सोडून जाणे उचित वाटले.—योहान १०:२४-४२; पडताळा मत्त. १०:२३. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील अध्याय ६९ आणि ८१ पाहा.
७ आमच्या क्षेत्रात: येशूच्या पावलांचे अनुकरण करत, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत असताना, आम्ही कितीही चातुर्याने आमचा संदेश सादर करण्याचा प्रयत्न केला तरी, आमच्या कार्यावर आक्षेप घेणारे घरमालक आम्हाला भेटतातच. आमच्या भूमिकेबद्दल आदराने सांगितल्यावरही त्या व्यक्तीची मनोवृत्ती बदलत नसल्यास, सभ्यतेने संभाषण थांबवून, पुढील घरी जाण्यास तेथून निघून जाणे उत्तम असेल.—मत्त. १०:१४.
८ पुष्कळ प्रसंगी, उंबरठ्यावरच ओरडू लागतात असे लोक आम्हाला भेटतात. अशा परिस्थितीत, ते क्षेत्र त्या दिवसासाठी सोडून जाणे सुज्ञतेचे ठरेल. त्या व्यक्तीच्या शेजाऱ्यांना भेटण्यास नंतर पुन्हा येऊ शकतो. आणि एखाद्या विशिष्ट भागात आम्हाला तोच अनुभव पुष्कळदा अनुभवण्यास मिळाला तर काय? कदाचित एखादा धमकावणारा जमाव एकत्र होऊन आम्हाला हानी करावयास धमकावू लागल्यास काय? मग, काही आठवड्यांसाठी किंवा महिन्यांसाठी तो गोंधळ निवळूपर्यंत, ते क्षेत्र पूर्ण न करणे सुज्ञतेचा मार्ग ठरेल. काही काळानंतर, त्या व्यक्तींची मनोवृत्ती बदलली आहे का आणि ते आमच्या संदेशाबद्दल अधिक अनुकूल आहेत का हे पाहण्यासाठी आपण चतुरतेने तेथे कार्य करण्याचा प्रयत्न करू शकतो.—जेथे व्यक्ती विशिष्टपणे भेट न देण्यास सांगतात किंवा तशाप्रकारची चिन्हे त्यांच्या दरवाजावर लावतात, तेव्हा ती बाब कशी हाताळावी यावरील सूचनेसाठी आमची राज्य सेवा याच्या या अंकातील प्रश्न पेटी पाहा.
९ सुरवातीलाच, चतुर राहिल्याने अशाप्रकारच्या घटना टाळल्या जाऊ शकतात. आम्हाला याची जाणीव आहे की, पुष्कळ लोक त्यांच्या धर्माच्या आधारासाठी अधिक लढाऊ बनत आहेत. अशा व्यक्तींचे प्राबल्य असणाऱ्या क्षेत्रांमध्ये, किंवा धर्माचा प्रचार आणि गौरव करणारे घोषवाक्य आणि चिटकवलेली कागदे दिसल्यास, आम्हाला आमचे शब्द अधिक काळजीपूर्वकतेने वापरण्याची गरज आहे. आम्ही एखाद्या ‘पवित्र शास्त्र’ किंवा ‘ख्रिस्ती’ संघटनेद्वारे आलो आहोत असा परिचय करून देण्याऐवजी, आपल्या कार्याच्या शैक्षणिक स्वरुपावर आपण जोर देऊ शकतो. लोकांना पवित्र शास्त्र दाखवण्यापासून किंवा त्यामधून वाचून दाखवण्यापासून आम्हाला थांबायचे नाही तरी, काही शास्त्रवचने दाखवायची असल्यास कोणती दाखवावीत हे काळजीपूर्वकतेने निवडून आम्ही पवित्र शास्त्र वापरण्याविषयी सावध राहू शकतो. मग, ‘मिशनरी,’ ‘प्रचार’ आणि विशेषकरून ‘धर्मांतर’ सारख्या मनाला दुखावणाऱ्या शब्दांचा अनावश्यक वापर देखील आपण टाळू शकतो.
१० यामुळे, चतुरपणा दाखवण्याच्या दुसऱ्या एका भागाकडे आम्ही येतो. भविष्यवाणी केल्याप्रमाणे, सर्व वंश आणि भाषा आणि राष्ट्र—आणि धार्मिक पार्श्वभूमीतून—विविध लोक यहोवाची उंचावलेली उपासना करावयास येत आहेत. (यश. २:२, ३; प्रकटी. ७:९) याला आम्ही त्याच्या आशीर्वादाचे चिन्ह मानतो आणि लहानाचे सहस्त्र होतात आणि क्षुद्र बलाढ्य राष्ट्र होते तेव्हा आम्हाला आनंद होतो. (यश. ६०:२२) त्याचवेळी, खऱ्या उपासनेसाठी भूमिका घेणाऱ्याची धार्मिक पार्श्वभूमी जाहीर करण्याची काहीच गरज नाही.
११ काही बांधव, घरोघरी आणि इतर ठिकाणी नवीन प्रचारकांचा परिचय करून देत असताना, विशेषकरून त्यांच्या आधीच्या धर्माबद्दल उल्लेख करतात आणि त्यांनी स्वतःमध्ये केलेला बद्दल याकडे घरमालकाचे लक्ष वेधतात, असे दिसून आले आहे. यामुळे घरमालकाचे मन दुःखित होऊ शकते आणि एखाद्या धर्मातून ख्रिस्ती धर्मात ‘धर्मांतर’ करण्याचा आमचा मुख्य हेतू आहे, अशी समजूत होऊ शकते. देव पक्षपाती नाही—तो लोकांचे धर्म न जुमानता, सर्व व्यक्तींसाठी आशेचा संदेश पुरवतो आणि सर्व पार्श्वभूमींच्या व्यक्ती, तो संदेश स्वीकारत आहेत. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) एखादा यहोवाचा उपासक झाल्यास, आम्हाला आनंद होतो, आणि तो कोणत्याही धार्मिक पार्श्वभूमीतून आला असला तरी, आम्ही त्याचे स्वागत करतो. परंतु, त्याचा पूर्वीचा धर्म आणि त्याने स्वतःमध्ये केलेला अफाट बदल या गोष्टींना विशेष समजून त्यांची जाहिरात करण्याची गरज नाही.
१२ अंत समीप येत असता, अधिक छळले जाण्याची आणि माणसांची मनोवृत्ती अधिक वाईट होण्याची आपण अपेक्षा करू शकतो. (२ तीम. ३:१२, १३) इतिहासात, आमचे कित्येक सोबतीचे दास विजयी झालेत, ही गोष्ट आम्हाला विश्वास देते की, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने आम्ही देखील तसे करू शकतो. तोपर्यंत, धैर्याने परंतु चतुराईने प्रचार करून, आम्ही “सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा,” हिची घोषणा करत राहू या.—तीत २:११.