घोषणा
▪ साहित्य सादरता
जानेवारी: देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक ४.०० रुपयांना. हे उपलब्ध नसल्यास, १९२-पानी जुन्या पुस्तकांना प्रत्येकी ६.०० रुपये खास सादरतेत देऊ शकता. आमच्याकडे, ह्या प्रकाराची पुढील पुस्तके अजूनही उपलब्ध आहेत: इंग्रजी: डीड मॅन गेट हियर बाय ईव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? गुजराती: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता, “तुझे राज्य येवो” आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते; हिंदी: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता आणि “तुझे राज्य येवो;” कन्नड: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता, “तुझे राज्य येवो” आणि “थिंग्स इन व्हीच इट इज इंम्पॉसीबल फॉर गॉड टू लाय;” मराठी: “तुझे राज्य येवो” आणि थोर शिक्षकाचे ऐका; तामिळ: सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? आणि “तुझे राज्य येवो;” तेलगू: सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? व तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे.
फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल. मोठ्या आकाराचे ४०.०० रुपयांना आणि लहान आकाराचे २०.०० रुपयांना.
मार्च: क्वेश्चन्स् यंग पीपल आस्क—आर्न्सस दॅट वर्क (जे इंग्रजी, मल्याळम आणि तामिळ मध्ये उपलब्ध आहे) २०.०० रुपयांना. जेथे हे उपलब्ध नाही तेथे तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक ४०.०० रुपयांना सादर केले जाऊ शकते (लहान आकाराचे पुस्तक २०.०० रुपयांना). याशिवाय, १९२ पानी पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी ६.०० रुपयांना देता येऊ शकते.
एप्रिल व मे: द वॉचटावरची एका वर्षाची वर्गणी ६०.०० रुपयांना. सहा महिन्यांच्या वर्गण्या आणि मासिक आवृत्तींच्या एका वर्षाच्या वर्गण्या ३० रुपयांना आहेत. (मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.)
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑडर्र फॉर्म (S-14) यावर पाठवावी.
▪ एप्रिल आणि कदाचित मे महिन्यात देखील सर्वांनी साहाय्यक पायनियरींग करण्यास खास प्रयत्न करावेत असे आम्ही मंडळीतील सर्वांना उत्तेजन देऊ इच्छितो. जर त्यांना एप्रिल महिन्यात करता येत नसेल तर, मे महिन्यात करावे. ह्या जादा कार्याच्या अपेक्षेमुळे, एप्रिल आणि मे महिन्यात, अधिक नियतकालिके इच्छिणाऱ्या मंडळ्यांनी त्यांची खास मागणी जानेवारी ३०, १९९४ च्या आधी पाठवावी.
▪ ह्या वर्षाच्या, मार्च २६, शनिवारी सूर्यास्तानंतर, साजरा करण्यात येणाऱ्या स्मारक दिनासाठी मंडळ्यांनी सोईस्कर व्यवस्था कराव्यात. प्रत्येक मंडळीला स्वतःचा स्मारक विधी साजरा करावासा वाटला तरी, प्रत्येक वेळी ते शक्य नसेल. अनेक मंडळ्या सामान्यपणे एकच सभागृह वापरतात तेव्हा, त्या संध्याकाळी एकापेक्षा अधिक मंडळ्या एखादी दुसरी सुविधा वापरू शकतात. नव्या आस्थेवाईकांना उपस्थित राहण्यासाठी काही गैरसोय होऊ शकेल यामुळे, स्मारक विधीचा कार्यक्रम उशीरा चालू होता काम नये. पुढे, एकापेक्षा अधिक मंडळ्या एकाच सभागृहाचा वापर करत असतील तर, दोन सभांमधील वेळ इतक्या जवळ ठेवू नका ज्यामुळे सभा चालू होण्याआधी किंवा संपल्यानंतर भेट देणाऱ्या लोकांचे अभिवादन करण्यासाठी, कोणाला तरी आणखी आध्यात्मिक मदत देण्याची व्यवस्था करण्यासाठी, वा उपस्थित असलेल्यांना उत्तेजनाची देवाणघेवाण करण्यासाठी वेळ राहणार नाही. या सर्व कारणांकडे अगदी सूक्ष्मपणे लक्ष दिल्यावर, स्मारक विधीला उपस्थित असलेल्या सर्वांना त्या प्रसंगाचा फायदा घेण्यात मदत करण्यास वडिलांनी शक्य त्या सर्व व्यवस्था करण्यासाठी निर्णय घेतला पाहिजे.
▪ रविवारी, एप्रिल १० रोजी, १९९४ च्या स्मारक विधीच्या हंगामाचे खास जाहीर भाषण दिले जाईल. त्या भाषणाचा विषय, “मानवी समाजाला धर्म अपयशी करत आहे का?” हा असेल. त्याची रूपरेषा पुरवली जाईल. ज्या मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट, विभागीय संमेलन अथवा खास संमेलन दिवस असेल तेथे हे भाषण पुढील सप्ताहांती देण्यात येईल. कोणत्याही मंडळीत हे भाषण एप्रिल १० आधी दिले जाणार नाही.
▪ सर्व मंडळ्यांना सेवा फॉर्मचा एका वर्षाचा पुरवठा पाठवला आहे. संबंधीत बांधवांना योग्य फॉर्मस्ची वाटणी करण्यात मंडळीच्या सचिवांना मदत करण्यासाठी साठ्यासोबत तपासणी-यादी पाठवली होती. जवळ असलेले सर्व फॉर्म, तपासणी-यादीवर दिलेल्या तारखांपेक्षा जुने असतील तर त्यांना लगेचच नष्ट करावेत; कृपया जुने फॉर्मस् वापरू नका. वर्षादरम्यान आणखी फॉर्मस्ची आवश्यकता असेल तर नेहमीप्रमाणे लिटरेचर ऑडर्र (S-14) फॉर्मचा वापर करून मागणी करावी, परंतु डिसेंबर १९९४ पर्यंतच वापरण्यात येतील इतक्यांचीच मागणी करा.
▪ मध्य भारताला हादरवून टाकणाऱ्या नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे आमच्या बांधवांवर त्याचा काही परिणाम झाला की नाही यासाठी अनेकांनी चिंता व्यक्त केली. परिणामीत क्षेत्रात राहणाऱ्या साक्षीदारांच्या सुरक्षिततेविषयीच्या अनेक विचारणा आम्हाला मिळाल्या व अशा प्रकारची विचारपूस केल्याने तसेच साहाय्य पुरवण्याच्या तुमच्या तयारीवरून तुमची आस्था व बंधूप्रेम दर्शवल्याद्वारे, ख्रिस्ती प्रेम आचरणात होते, हे पाहणे समाधानतेचे होते. आम्हाला हे सांगण्यास आनंद वाटतो की बांधवांना, शारीरिक दुखापत किंवा मालमत्तेची नासधूस अशी कोणतीही गंभीर बाधा पोचल्याची बातमी आमच्याकडे आली नाही. विस्तृत क्षेत्रातील साक्षीदार कुटुंबांना तसेच लोणावळ्यात आम्हा सर्वांना भूकंपाचे धक्के जाणवले व नुकसानीच्या किरकोळ घटना झाल्या, परंतु साक्षीदारांच्या घरांचे किंवा त्यांच्यातील सदस्यांची मोठी हानी झाल्याचा पुरावा आम्हाला अजूनही मिळालेला नाही. तुमच्या प्रेमळ काळजीबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो व आम्ही शेवटल्या काळात राहात आहोत त्या चिन्हाचा भूकंप एक भाग आहे तेव्हा, यहोवाची सेवा थोड्या सुरक्षिततेत करत राहू शकतो अशी प्रार्थना करतो.