वार्षिक अहवाल—प्रोत्साहनाचा खजिना
१ यहोवाच्या आश्चर्यकारक कार्यांविषयीचे अहवाल आणि अनुभव नेहमीच देवाच्या सेवकांसाठी उत्साहवर्धक ठरले आहेत. (ईयोब ३८:४, ७; नीती. २५:२५; लूक ७:२२; प्रे. कृत्ये १५:३१) या कारणास्तव, यहोवाच्या साक्षीदारांचा वार्षिक अहवाल प्रोत्साहनाचा खजिना आहे.
२ प्रत्येक वार्षिक अहवाल, यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यांबद्दल आणि साध्य केलेल्या गोष्टींबद्दलचा जगभरातील उभारणीकारक अहवाल सादर करतो. विश्वासाला बळकटी देणारे अनुभव, यहोवाचे मार्गदर्शन, संरक्षण आणि त्याच्या लोकांवरील आशीर्वाद याबद्दल ठळकपणे सांगतात. सर्व खंडातील आणि सागराच्या बहुतेक सर्व द्वीपांवरील लोकांपर्यंत पवित्र शास्त्रीय सत्य आणण्याकरता, कुटुंब, मित्र, आणि मायदेशाचा त्याग केलेल्या दृढनिश्चयी पुरुष आणि स्त्रियांबद्दल हा वार्षिक अहवाल सांगतो.
३ या वार्षिक अहवालाने पुष्कळ वाचकांना, देवाला करत असलेली त्यांची सेवा वाढवण्याकरता प्रवृत्त केले आहे. एका वाचकाने लिहिले: “मी ते भरभर वाचू शकत नाही. आतापर्यंत मी वाचलेल्या गोष्टी फारच उत्तेजनदायक ठरल्या आहेत. इतर जण दबावाखाली जे कार्य करतात ते पाहून, मी त्यांच्याहून अधिक सुवार्तेचा प्रचार करू शकले असते असे मला वाटू लागते.”
४ यहोवाच्या साक्षीदारांचा वार्षिक अहवाल, १९२७ नंतरच्या प्रत्येक वर्षापासून, प्रेरित करणाऱ्या अहवालांचा आणि अनुभवांचा एक खरोखरचा खजिना ठरला आहे. या अद्वितीय प्रोत्साहनाच्या उगमाचा तुम्हाला संपूर्णतः लाभ होत आहे का? असे करण्यासाठी, वार्षिक अहवाल मिळताच तो वाचून काढण्याची खात्री ठेवा. मग, संपूर्ण वर्षभरात, तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला लागणाऱ्या प्रोत्साहनासाठी विशिष्ट भागांचे पुनरावलोकन करा.