ईश्वरशासित वृत्त
अर्जेन्टिना: फेब्रुवारी मध्ये ९८,६०१ प्रचारकांचा नवा उच्चांक गाठला होता. त्याच महिन्यात, ५०७ नव्या शिष्यांनी बाप्तिस्मा घेतला होता.
बेनिन: फेब्रुवारी मध्ये २,९६७ प्रचारकांनी अहवाल दिला होता. एका वर्षामागच्या कार्याबरोबर तुलना केल्यावर, प्रचारकांची संख्या १३.८ टक्के, तासांची संख्या ६.१ टक्के, सादर केलेल्या मासिकांची संख्या ४०.६ टक्के, आणि पवित्र शास्त्र अभ्यासांची संख्या २५.१ टक्के अशी वाढ झाली आहे.
इक्वेडोर: फेब्रुवारी महिन्यात क्षेत्र कार्याचा अहवाल देणाऱ्या २३,१७६ प्रचारकांनी ४२,२१९ गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालविले. मागच्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा ही २,१८० प्रचारकांची व ३,१८३ पवित्र शास्त्र अभ्यासांची वाढ होती.
आयर्लंड: फेब्रुवारी मध्ये ४,०९३ जणांनी अहवाल देऊन प्रचारकांनी ५९वा सतत उच्चांक गाठला. २,६८२ पवित्र शास्त्र अभ्यास चालविलेल्या नव्या उच्चांकामुळे भवितव्यातील वाढ आशादायक वाटते.
पेरू: फेब्रुवारी महिन्यात पेरू मधील ४३,३६६ प्रचारकांनी ३,६९,४३७ पुनर्भेटी आणि ६८,०९० पवित्र शास्त्र अभ्यासांचा अहवाल कळविला आहे. लिमा मध्ये एक नवे सम्मेलन गृह बांधले व त्याच्या समर्पणाला २१,२४० उपस्थित होते.
ताहिती: फेब्रुवारी मध्ये १,६०४ प्रचारकांनी १३ टक्के वाढीचा अहवाल दिला. ताहिती मधील प्रचारकांचा हा ६४वा सतत उच्चांक होता.
झीयर: ह्या राष्ट्रामध्ये आर्थिक आणि राजकीय गोंधळ असतानाही, तेथील बांधवांनी फेब्रुवारी महिन्यात ७१,०९८ प्रचारकांच्या नव्या उच्चांकाचा अहवाल दिला आहे. मागील वर्षापेक्षा ही ९ टक्क्यांनी वाढ होती. मंडळीतील प्रचारकांचे क्षेत्र कार्यामध्ये सरासरीने १६.८ तास होत आहे. झीयर मध्ये आता ६,००० पेक्षा अधिक नियमित पायनियर आहेत.
कॅरीबीयन क्षेत्रातील अरुब, ग्वाडलप, मार्टनेक, सेंट किट्स, आणि यु. एस. वरजीन बेटे, या सर्वांनी, फेब्रुवारी मध्ये प्रचारकांच्या नव्या उच्चांकाचा अहवाल दिला आहे.