आस्था कशी वाढवावी
१ एका शब्दकोशातून आम्ही शिकतो की “वाढविणे” म्हणजे मशागत किंवा वाढ करविणे. पण ह्या शब्दाचा अर्थ कष्टाने, काळजीने किंवा अभ्यासाने सुधरणे असा देखील होतो. आपल्या सेवेचा महत्त्वपूर्ण हेतु म्हणजे शिष्य बनविणे. (मत्तय २८:१९, २०) या कारणासाठी, क्षेत्रसेवेमध्ये मिळालेल्या आस्थेला आपण वाढवण्याचे परिश्रम घेतले पाहिजेत.
२ नम्र व्यर्क्तिठायी होणाऱ्या आध्यात्मिक वाढीला चालना देण्यासाठी नियमित भेटी दिल्या पाहिजेत. फलदायी पुन:र्भेटीने नियमित पवित्र शास्त्र अभ्यासाकडे निरविले पाहिजे.
३ जे बहुदा आस्था दाखवतात अशांकडेच तुम्ही पुन्हा जाता का? पुन्हा जाण्यासाठी एखादे प्रकाशन घरमालकाने तुमच्याकडून घेतलेच पाहिजे असे काही नाही. एक पायनियर नेहमीच प्रथम भेटीत इतकी प्रकाशने देत नाही तरी कोणी स्नेहभावाचा व्यक्ति भेटला की त्याच्याकडे तो पुन्हा जातो. शास्त्राधारीत केलेली चांगली चर्चा पुन:र्भेटीला एक उत्तम आधार ठरु शकते.
४ पुन:र्भेटीत पवित्र शास्त्र अभ्यास चालू करण्यासाठी हस्तपत्रिकांचा उपयोग करणे: आपल्या हस्तपत्रिकांचे विविध विषय आपल्या सध्याच्या दिवसांसाठी प्रसंगोचित आहेत. पवित्र शास्त्राचे ज्ञान घेण्याच्या व त्याचे जीवनात अवलंबन करण्याच्या गरजेवर ते जोर देतात.
तुम्ही म्हणू शकाल:
▪“मागच्या भेटीत आपण पवित्र शास्त्रावर विश्वास का ठेवावा याच्या काही कारणांवर चर्चा केली होती. पवित्र शास्त्र कोणत्या प्रकारच्या भविष्याची माहिती देते?” शांतीदायक नविन जगातील जीवन या हस्तपत्रिकेच्या पान ३ वरील दुसऱ्या परिच्छेदापासून वाचण्यास सुरवात करा. त्यातील शास्त्रवचने पहा. तुम्ही जे वाचत आहा त्याबद्दल घरमालकाची काय प्रतिक्रिया आहे ते विचारा. पान ५ वरील “तुम्हास ते कसे शक्य आहे” या पोटमथळ्या खालील माहितीचे विवरण देऊन समाप्त करा.
५ अशाच पध्दतीने, मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? ही हस्तपत्रिका वापरु शकता.
तुम्ही म्हणू शकाल:
▪“आपण आधी चर्चा केल्यानुसार, पुष्कळ लोकांनी देवावरचा विश्वास गमावला आहे. उदाहरणार्थ, ते विचारतात, ‘जर देव एवढा सामर्थ्यवान आहे तर तो लोकांना मरण्यास परवानगी का देतो?’ ही हस्तपत्रिका त्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यास सहाय्यक ठरेल.” पान २ वरील ४थ्या परिच्छेदाकडे लक्ष न्या. प्रत्येक परिच्छेदाचे वाचन झाल्यावर त्यासंबंधित एखादा प्रश्न विचारा, व अवतरीत न करण्यात आलेल्या शास्त्रवचनांचा उपयोग करा. तुमच्या मंडळीत समस्या किंवा पहा! माहितीपत्रकांचा साठा असेल, तर त्यांचाही अशाच प्रकारे उपयोग करु शकता.
६ अभ्यास पुढे चालू ठेवा: येथे सुचविलेल्या पद्धतीचे अनुकरण केल्याने तुम्ही एक गृह पवित्र शास्त्राभ्यासाचा आरंभ करीत आहात. नियमित चर्चा होण्यासाठी, घरमालकाला तुमच्या भेटीच्या अंती विचारा: “काही मिनिटातच आम्ही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे उत्तर दिले याकडे तुम्ही लक्ष दिले का? पुढच्या आठवडी आपण पुनरुत्थानाच्या आशेविषयी किंवा जो विषय तुम्हास आवडेल त्यावर जरा जास्त वेळ चर्चा करु या.” प्रत्येक भेटीत तुम्ही ह्या विषयातील केवळ एकाच प्रश्नावर चर्चा करु शकता. व उचित वेळी, माहितीपत्रकातून किंवा अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकातून अभ्यास चालू करु शकता.
७ पवित्र शास्त्राचा अभ्यास एका खऱ्या सत्य-शोधकासोबत करणे किती समाधानकारक आहे! आस्था कशी निर्माण करावी यासाठी सुचविलेल्या पध्दतीनुसार चालल्यामुळे आपली सेवा फलदायी करण्यासाठी आम्हास आशीर्वाद मिळो.