पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याच्या इराद्याने परतणे
१ आरंभाला आस्थेवाईक व्यक्ति आढळल्यास ही आस्था जिवंत ठेवण्यासाठी आम्ही पराकाष्ठा केली पाहिजे. पुनर्भेटी केल्यामुळे जीवन प्रदायक पवित्र शास्त्रीय चर्चेत व पवित्र शास्त्र अभ्यासात थेटपणे जाता येईल. यासाठीच, प्रभावी पुनर्भेटी घेता येण्यासाठी पुढील प्रस्तावांचा विचार करा.
आरंभाच्या भेटीच्या शेवटी तुम्ही असे विचारुन पुनर्भेटीसाठी पाया घालू शकता:
▪ “पवित्र शास्त्र हे देवाकडून प्रेरणा मिळालेले पुस्तक आहे असे कधी तुम्हाला नवल वाटले होते का?” मग, परत भेट घेताना तुम्ही म्हणू शकालः “मागे मी होतो तेव्हा पवित्र शास्त्र प्रेरित आहे का असा प्रश्न मी मांडला होता. याबद्दल भरपूर पुरावा आहे. या प्रश्नाची उजळणी करताना मला जे मनोरंजक आढळले आहे ते तुम्हाला मला वाचून दाखवू द्या.” रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठ ६० वर उघडून “इव्हिडन्सेस ऑफ इन्स्पायरेशन” या उपशिर्षकाखाली वाचा.
२ पवित्र शास्त्र आज आम्हासाठी व्यावहारिक आहे का? पवित्र शास्त्राने व्यावहारिक ठरण्यासाठी त्याने त्याच्या लाभाचा पुरावा दाखवून दिला पाहिजे.
पुनर्भेटीची सुरवात करण्यासाठी तुम्ही असे विचारु शकता:
▪ “पवित्र शास्त्राच्या सल्ल्याने एखाद्या व्यक्तिच्या वर्तणूकीवर कसा परिणाम करण्यास हवा? पौलाने इफिसकर ४:२३, २४ मध्ये जे काही म्हटले आहे ते पवित्र शास्त्र जीवनावर केवढा सामर्थ्ययुक्त प्रभाव घडवू शकते हे स्पष्ट करते.” द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स्? या पुस्तकाच्या १७५ पानावरील परिच्छेद १ च्या शेवटापासून वचनाचे थेट वाचन करा. मग घरमालकास पृष्ठ १६३ वरील चित्रात काय दिसते ते विचारा. “जो सूज्ञांची सोबत धरतो तो शहाणा होय; पण मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” मग, पृष्ठ १६३ वरील परिच्छेद २ चे शेवटले वाक्य वाचा. “पवित्र शास्त्राचे अनादिकाळाचे सूज्ञान, मानवाच्या समस्याबद्दल मानवापेक्षा ते दाखवून असलेले श्रेष्ठ अंतर्दृष्टी ते, एका श्रेष्ठ उगमाकडून आपल्याकडे आले आहे याचा पुरावा देते. आपण आपल्या पुढल्या भेटीत, पवित्र शास्त्र प्रेरित आहे याबद्दलच्या अधिक पुरावा बघू या.”
३ आपण पवित्र शास्त्र का वाचावे? या प्रश्नाबद्दल द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स्? या पुस्तकातून थेटपणे केलेली चर्चा पवित्र शास्त्राभ्यासापर्यंत निरवू शकते.
संभाषण सुरु करण्यासाठी तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “आज लोकांना इतक्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्यांना असे वाटत आहे की, कोठे विश्वासार्ह मार्गदर्शन मिळू शकते का. मला पवित्र शास्त्र हे उत्तेजन पुरविणारे व व्यावहारिक मदत देणारे अमर्याद उगम असल्याचे आढळले आहे. पवित्र शास्त्रात स्तोत्रसंहिता १:१, २ मध्ये जे अभिवचन देण्यात आले आहे त्याची मला तुम्हासोबत सहभागिता करू द्या. [वाचन करून त्यावर त्रोटक विवेचन द्या.] द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स्? हे पुस्तक पवित्र शास्त्राच्या विश्वासहार्यतेवर आपला विश्वास वाढवते व पवित्र शास्त्रात आढळणारी व आमच्या दिवसात देखील दैनंदिन जीवनासाठी लागू होणारी व्यावहारिक सूचना आमच्या लक्षात आणून देते. उदाहरणार्थ, येथे पृष्ठ १७० वर परिच्छेद २३च्या वर ‘प्रिन्सीपल्स दॅट रिअली वर्क” हे उपशिर्षक लक्षात घ्या. मग, परिच्छेद २३-२६ चा वापर करून पवित्र शास्त्र अभ्यासाच्या व्यवस्थेचे प्रात्यक्षिक करून दाखवा. “पुढील आठवडी आपण, पवित्र शास्त्रापासून लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे, या प्रश्नावर विचार करू.”
४ या उरलेल्या वेळेमध्ये पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना जी पूर्ण रुपाची साक्ष देण्यात येत आहे त्यात सहभागी होण्यासाठी वेळेचा सूज्ञ वापर करा. (पडताळा प्रे. कृत्ये २०:२१.) पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याच्या इराद्याने पुनर्भेटी घेण्यामुळे ज्यांना आम्ही प्रचार करतो त्यांना सार्वकालिक जीवनाचा अर्थ होऊ शकतो.