ईश्वरशासित वृत्त
ग्रीनलँड: ऑक्टोबर महिन्यात बाहेरील पुष्कळ ठिकाणांना भेटी देण्यात आल्या व बऱ्याच प्रकाशनांचे वितरण झाले. या देशात अगदी उत्तरेकडील दोन मंडळ्यातील प्रचारकांनी या महिन्यात सरासरी २२ तासांपेक्षा अधिक कार्य केल्याचे कळवले आहे.
तुवालू: ऑक्टोबरमध्ये ६२ प्रचारकांनी अहवाल दिल्यामुळे २७ टक्के वाढ झाली.
इथोपिया: इथोपियाच्या सरकारने यहोवाच्या साक्षीदारांना नोंदणीयुक्त संस्था अशी शासकीय मान्यता प्रदान केली आहे. या कायदेशीर मान्यतेमुळे बंधूंना अत्यांनद झाला असून ते राज्यकार्यात पुढे सरसावत आहेत. प्रकाशने मिळत असून संमेलने भरविली जात आहेत.