सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा
१ देवाच्या सेवकांसाठी आजही, गतकाळाप्रमाणेच पवित्रता राखणे ही ईश्वरी गरज आहे. ही पवित्रता काय आहे तेवढेच नव्हे तर तिने यहोवाच्या आमच्या उपासनेत कसे व का अंतर्भूत असण्यास हवे ते आम्हा प्रत्येकाने जाणून घेण्याची निकडीची गरज आहे. यासाठीच, १९९१ च्या सेवा वर्षात होणाऱ्या खास संमेलन दिवसाचे शीर्षक “सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा” असे घेण्यात आले आहे.—१ पेत्र १:१५.
२ यहोवाची नीतीमान तत्त्वे व कायदे, तो एक पवित्र देव या नात्याने त्याच्याकडून येत असल्यामुळे आम्ही ज्या नीतीमान भूमिकेचा आज आनंद घेत आहोत ती, आमचे त्याच्यासोबत असणारे जवळचे, व्यक्तीगत नातेसंबंधाच्या परिणामामुळे आहे. यामुळेच, आम्ही आमचे देवाशी असणारे हे नाते कशाप्रकारे अधिकपणे सुधारू शकतो याविषयी कार्यक्रमात माहिती दिली जाईल. यात त्याच्या पवित्र दर्जांना, मग ते दर्जे कितीही लहान गोष्टींविषयी का असेनात, त्यांना आज्ञाधारकपणा दाखवणे याचा समावेश असेल. (लूक १६:१०) यहोवाच्या पवित्र दर्जांबद्दल अधिक खोलपणे आदर वाढविण्याची गरज तसेच ते आमचे विचार, वागणूक व इतर मार्गात का प्रभावी असण्यास हवेत याविषयीची मदत कार्यक्रमाद्वारे दिली जाईल.
३ या कार्यक्रमात जी दोन प्रमुख भाषणे होणार आहेत त्यांची शीर्षके, “प्रगतिशील शुद्धीकरणाच्या प्रक्रियेस अधीन होणे,” व “यहोवाच्या पवित्र लोकांच्या कार्याची अभिवृद्धी करणे” अशी आहेत. जगात दररोज घडत असणाऱ्या थरारक गोष्टी आमच्या मनावर काळाच्या निकडीचे महत्त्व प्रतिबिंबित करीत असता या नव्या कार्यवर्षाच्या खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम, यहोवाकडे मार्गदर्शनासाठी सतत दृष्टी लावण्यास व आपल्या आचरणात पवित्र राहून त्याला योग्यपणे संतुष्ट करण्यात आम्हाला चालना देईल.—१ पेत्र १:१४, १६.