घोषणा
● प्रकाशन देणगीः
सप्टेंबर: स्कूल माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही ३२ पानी रु. ३.
ऑक्टोबरः क्रिएशन पुस्तक ३० रुपयांना द्यावे. लहान आकाराचे रु. १५. (ज्या भाषांत हे उपलब्ध नसेल तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज हे द्यावे.)
नोव्हेंबरः एका वर्षाची वर्गणी अवेक! किंवा द वॉचटावर किंवा दोहोंसाठी प्रत्येकी ४० रुपयांना. सहा महिन्यांची व मासिक अंकासाठी वार्षिक वर्गणी रु. २०. (मासिक अंकाची सहा महिन्यांची वर्गणी नाही.)
डिसेंबरः न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र व त्रैक्य किंवा “पहा!” माहितीपत्रकासह रु. ४३.
जानेवारी: क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक १५ रुपयांना सादर करा. (जेथे हे उपलब्ध नसेल तेथे खास सादरतेची जुनी १९२ पानांची दोन पुस्तके रु. १०ला किंवा एक ५ रुपयांना द्या.)
फेब्रुवारी व मार्चः खास सादरतेची जुनी १९२ पानांची दोन पुस्तके रु. १० ला किंवा एक ५ रुपये.
● प्रत्येक मंडळीला तीन लिटरेचर इन्वेंटरीचे फॉर्म्स मिळाले असतील व सप्टेंबर १ पर्यंतचा प्रकाशन साठा मोजून घेतला असेल. तर आता हे फॉर्म्स पूर्ण भरा व मूळ प्रत सप्टेंबर ६, १९९० आधी दप्तराला मिळेल अशी पाठवा. दुसरी प्रत तुमच्या फाईलमध्ये ठेवा. तिसरी प्रत तुम्हाला कच्चे काम करावे या हेतूने पाठविण्यात आली आहे.
● सर्व प्रचारकांनी आपल्या स्वतःच्या टेहळणी बुरुज तसेच अवेक! याच्या वार्षिक वर्गण्या मंडळीमार्फत पाठवाव्यात. याचप्रमाणे तुम्हाला व्यक्तीगतरित्या लागणाऱ्या प्रकाशनांची व इतर गोष्टींची मागणी भारताच्या शाखा दप्तराला स्वतंत्रपणे न पाठवता ती मंडळीद्वारेच केल्यास ते साहाय्यक ठरेल.
● मंडळ्या आता नेपाळी भाषेतील द वॉचटावर आणि कन्नड भाषेतील अवेक! मासिकासाठी नियमित रुपाच्या डिस्ट्रिब्युटर्स ऑर्डर्स पाठवू शकतात. ही दोन्हीही मासिक रुपाने प्रकाशित करण्यात येतील. क्षेत्रावरील लोकांना या नव्या आवृत्त्यांची वार्षिक वर्गणी सादर करता येईल.
● पत्त्यात बदल करावा अशी विनंती पाठविणाऱ्या मंडळ्यांनी हे ध्यानात घ्यावे की, मासिकांची लेबले दोन महिन्याआधी तयार केली जात असल्यामुळे साधारण दोन महिने मासिके तुमच्या जुन्याच पत्त्यावर पाठविण्यात येतील. तुमचा हा पत्ताबदल तुम्ही स्थानिक पोस्टाला कळविला नाही तर मग, मासिके जुन्या पत्त्यावर जाऊन परत संस्थेला येतील व येथे आणखी तिकिटांचा भार लावावा लागेल, आणि मंडळीला मूल्यवान मासिकांचे नुकसान सोसावे लागेल.
● वार्षिक अहवाल पुस्तके परदेशातून येत असल्यामुळे तुम्ही मागणी पाठविताना जो पत्ता दिला असेल त्या पत्त्यावर ती ब्रुकलिनहून येतील. तेव्हा मागणी पाठविल्यावर तुमचा पत्ता बदलला असेल तर स्थानिक पोस्टात तुमचा नवीन पत्ता देऊन ठेवा आणि या नव्या पत्त्यावर तुमची ऑर्डर पोस्टाने पाठविली जात आहे याची खात्री करून घ्या.
● मासिके व प्रकाशनांच्या दरात सप्टेंबर १, १९९० पासून थोडी सुधारणा करण्यात येत आहे. दरातील तफावत तुमच्या खात्यावर दाखविण्यात येईल. दराची वाढ दाखविणारे फॉर्म्स प्रत्येक मंडळीला पाठविण्यात येतील.
● प्रकाशने पुन्हा उपलब्धः
द किंग्डम इंटरलिनियर ट्रान्सलेशन ऑफ द ग्रीक स्क्रिपचर्स —इंग्रजी
“ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” —इंग्रजी
रेवलेशन—इट्स् ग्रँड क्लायमॅक्स ॲट हॅण्ड! —इंग्रजी
यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ् (लहान) —इंग्रजी
मेकिंग युवर फॅमिली लाईफ हॅपी —इंग्रजी, मल्याळम
हॅपिनेस—हाऊ टू फाइण्ड इट —इंग्रजी
लिसनिंग टू द ग्रेट टीचर —इंग्रजी
सर्व्हायवल इन टू अ न्यू अर्थ् —इंग्रजी
थिऑक्रेटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुक —इंग्रजी
चुसिंग द बेस्ट वे ऑफ लाईफ —इंग्रजी
द ट्रुथ दॅट लिड्स् टू इटर्नल लाईफ —उर्दु
एन्जॉय लाईफ ऑन अर्थ् फॉरएव्हर! —हिन्दी, तेलगू, उर्दु
“धिस गुड न्यूज ऑफ द किंग्डम” —बंगाली, कोकणी (कन्नड)*
● नवी प्रकाशने उपलब्ध:
शुड यु बिलिव्ह इन द त्रिनिटी? —कन्नड, लुशाई
अवेक! माहितीपत्रक क्र. ८/१ —हिंदी
व्हाट डू जेहोवाज् विटनेसेस बिलिव्ह (टी-१४) —कन्नड, कोकणी (कन्नड)*, मल्याळम
लाईफ इन अ पीसफूल न्यू वर्ल्ड (टी-१५) —कन्नड, कोकणी (कन्नड),*
व्हॉट होप फॉर द डेड लव्हड् वन्स् (टी-१६) —कन्नड, कोकणी (कन्नड)*, मल्याळम
क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क —मल्याळम, तामिळ
● प्रकाशन साठा संपला:
जेहोवाज् विटनेसेस युनायटेडली डुईंग गॉडस् वील —मल्याळम
* कोकणी-गोअन लिपीत उपलब्ध नाहीत; केवळ कोकणी-कन्नड लिपीत उपलब्ध.