वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९० पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९०
km ८/९० पृ. ३

घोषणा

● प्रकाशन देणगीः

ऑगस्ट व सप्टेंबरः स्कूल माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही रु. ३.

ऑक्टोबरः क्रिएशन पुस्तक ३० रुपयांना द्यावे. लहान आकाराचे रु. १५. (ज्या भाषांत हे उपलब्ध नसेल तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज हे द्यावे.)

नोव्हेंबरः एका वर्षाची वर्गणी अवेक! किंवा द वॉचटावर किंवा दोहोंसाठी प्रत्येकी ४० रुपयांना. सहा महिन्यांची व मासिक अंकासाठी वार्षिक वर्गणी रु. २०. (मासिक अंकाची सहा महिन्यांची वर्गणी नाही.)

डिसेंबरः न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र व त्रैक्य किंवा “पहा!” माहितीपत्रकासह रु. ४३.

जानेवारी: क्वश्‍चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक १५ रुपयांना सादर करा. (जेथे हे उपलब्ध नसेल तेथे खास सादरतेची जुनी १९२ पानांची दोन पुस्तके रु. १०ला किंवा एक ५ रुपयांना द्या.)

फेब्रुवारी व मार्चः खास सादरतेचे जुने १९२ पानांची दोन पुस्तके रु. १० ला किंवा एक ५ रुपये.

● प्रांतिय अधिवेशन बदललेः क्वुईलॉन ऐवजी आता त्रिवेंद्रम येथे सप्टेंबर २७-३०, १९९०ला आणि कॅननोर ऐवजी तेलीचेरी येथे डिसेंबर २७-३०, १९९० ला हे अधिवेशन भरेल.

● संस्थेला पाठविण्यात येणाऱ्‍या प्रत्येक पत्रात तुमच्या मंडळीचा क्रमांक नेहमी नमूद करावा व सोबत मंडळीचे नावही लिहिले जावे ही अगत्याची विनंति आहे. यामुळे आमच्या कामात सुलभता मिळेल आणि कोणत्या मंडळीचे ते विशिष्ट पत्र आहे हे आम्हाला कळू शकेल. खासपणे जेथे पैशांचा व्यवहार असतो तेथे हा मंडळीचा किंवा गटाचा क्रमांक लिहिणे आवश्‍यक आहे.

● संस्थेला पाठविण्यात येणाऱ्‍या बऱ्‍याच वर्गणी कपट्यातील मजकूर स्पष्ट नसतो. कधी कधी घरमालकाचे नाव व त्याच्या घरास दिलेले नाव वेगळे करण्यास मोठे कष्ट पडतात. यासाठी स्वल्पविरामाचा वापर योग्य ठरु शकेल. इंग्रजीत लिहिले जाणारे ८ व ३ हे क्रमांक तसेच “बी” हे अक्षर यांचा फरक लक्षात येत नाही. याचा परिणाम मासिक भलत्याच पत्त्यावर जाऊन तेथून संस्थेला परत येते. तसेच सर्व तपशीलाची काळजीपूर्वक तपासणी केल्यावर योग्य तो पीनकोड आहे का हे देखील तपासून पहावे.

● अध्यक्षीय देखरखे किंवा त्यांनी नेमलेल्या कोणी सप्टेंबर १ रोजी किंवा त्यांनतर होईल तितक्या लवकर मंडळीचा हिशोब तपासावा.

● ऑगस्टसाठी असणारा मंडळीचा अहवाल तयार झाल्यावर ॲनालिसिस रिपोर्ट फॉर्म (एस-१०) पूर्ण भरावा व तो संस्थेला पाठविण्याआधी दोनदा तपासावा. या फॉर्मच्या मागील बाजूस, नियमित पायनियरांकडून ऑगस्टचे अहवाल मिळाल्यावर लागलेच रेग्युलर पायनियर इन्फॉर्मेशन रिपोर्ट ही माहिती पूर्ण भरावी. हा फॉर्म संस्थेला सप्टेंबर ६ पर्यंत पाठवावा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा