वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९० पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९०
km ५/९० पृ. ७

घोषणा

● प्रकाशन देणगीः

मे व जूनः द वॉचटावर वर्गणी. वर्षभराकरिता रु. ४०. सहा महिन्याच्या वर्गणीस तसेच दरमाही प्रकाशित होणाऱ्‍या मासिकाकरिता रु. २०. महिन्यात एक अंक प्रसिद्ध होणाऱ्‍या मासिकाकरिता सहा महिन्यांची वर्गणी नाही. जेव्हा वर्गणी नाकारण्यात येते त्यावेळी दोन मासिके व एक माहितीपत्रक ७ रुपयांना द्या.

जुलैः नवे पुस्तकः द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? १० रु. (जेथे ते उपलब्ध नसेल तेथे खास सादरतेचे १९२ पानी जुने पुस्तक ५ रुपयांना द्या.)

ऑगस्ट व सप्टेंबरः स्कूल माहितीपत्रक सोडून इतर कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक रु. ३.

ऑक्टोबरः क्रिएशन पुस्तक रु. ३०ला सादर करा. लहान आकाराचे रु. १५. (इतर भाषेत जेथे हे उपलब्ध नसेल तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टेरिज पुस्तक सादर करावे.)

नोव्हेंबरः अवेक! किंवा द वॉचटावर यापैकी एका किंवा दोहोंकरिता वार्षिक वर्गणी, प्रत्येकी रु. ४०. सहा महिन्याची व दर महिन्यास प्रकाशित होणाऱ्‍या मासिकाची वर्षभराची वर्गणी रू. २०. (दर महिन्यास प्रसिद्ध होणाऱ्‍या अंकाची सहामाही वर्गणी नाही.)

● अध्यक्षीय देखरखे किंवा त्यांनी नेमलेल्या कोणी जून १ रोजी किंवा त्यांनतर होईल तितक्या लवकर मंडळीचा हिशोब तपासावा.

● ज्या सर्व मंडळ्यांनी अद्याप मेमोरियल अहवाल कार्ड (एस-७) भरून पाठविले नसेल ते कृपया तत्काळ पाठविण्याची व्यवस्था करावी.

● ऑगस्ट व सप्टेंबर दरम्यान फक्‍त गुजराथी, हिंदी आणि कन्‍नड भाषेतील अवेक! माहितीपत्रक एका खास मोहिमेद्वारा देण्याचे करा. यातील तीन अंक केवळ रु. १.५०ला द्यावीत. या मोहिमेस आपला संपूर्ण पाठिंबा देणे बरे, की ज्यायोगे या जुन्या प्रकाशनांचा साठा बाहेर पडून लोकांच्या हातात पडेल. या खास व्यवस्थेखालील योजनेत जी माहितीपत्रके वितरीत केली जातील त्यांचे क्रेडीट मागण्यात एस-२० चा जो निळा फॉर्म आहे त्यावरील डाव्या बाजूच्या रकान्यातील खालच्या दोन ओळीत वेगवेगळ्यापणे “पायनियर स्पेशल कँपेन ब्रोशूर” हे पहिल्या रेघेवर आणि “पब्लीशर स्पेशल कँपेन ब्रोशूर” असे दुसऱ्‍या रेघेवर लिहून आकडे दाखवा. त्यांचा दर प्रचारकाकरिता ५० पैसे व पायनियरांसाठी ४० पैसे असा असेल, म्हणून मंडळीला प्रत्येक पायनियर माहितीपत्रकामागे १रु. ३५पैसे व प्रत्येक प्रचारक माहितीपत्रकामागे १रु. २५पैसे क्रेडीट मिळेल. ही व्यवस्था फक्‍त वर उल्लेखित भाषेतील माहितीपत्रकांचा साठा असेपर्यंत व त्या खास मोहिमेपुरतीच आहे. ही आठवण असेलच की, जसे यापूर्वी प्रसिद्ध झाले होते त्याचप्रमाणे ही सर्व माहितीपत्रके खपविल्यानंतर त्यांचा मासिके म्हणून अहवाल द्यावा. तसेच शाखा दप्तराचे साठ्यात मर्यादित पुरवठा असल्याने या जुन्या माहितीपत्रकाच्या मागण्या, प्रथम पोच, प्रथम सेवा या क्रमाने हाताळल्या जातील.

● नवीन प्रकाशने उपलब्धः तुम्ही त्रैक्य मानावे का?—गुजराथी, कन्‍नड व लुशाय भाषेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा