तुमच्या मे महिन्याच्या कोणत्या योजना आहेत?
१ मे महिना आम्हापैकी अनेकांच्या बाबतीत क्षेत्रकार्याच्या वाढत्या हालचालींची सुरवात करतो. सेवाकार्यातील वाढत्या हालचालींच्या अनुषंगाने व्यक्तीगत अशी ध्येये ठेवण्यासाठी मे हा महिना खूपच उपयुक्त आहे.
२ तुमच्या मंडळीने मे महिन्यासाठी कसल्या प्रकारच्या क्षेत्रकार्याची योजना आखली आहे? क्षेत्रकार्याच्या अधिक सभा तसेच सायंकाळचे साक्षीकार्यही समाविष्ट करण्यात आले आहे का? या व्यवस्थेचा लाभ घ्यावा व क्षेत्रकार्यात इतरांसोबत कार्य करावे यासाठी तुम्ही आपल्या आराखड्यात बदल करू शकाल का? तुम्हाला कमी महत्त्वाच्या कामांना तात्पुरते बाजूला ठेवता येईल का?
३ स्मारकविधीला उपस्थित राहिले होते अशांची भेट घेण्यासोबत, जे तुम्ही मागे भेट घेताना फारच कामात होते किंवा घरी नव्हते अशा आणखी आस्थेवाईक लोकांना शोधण्यासाठी मे महिन्यातील कालावधी चांगला ठरू शकेल. तुम्ही पुढील साक्ष देता यावी यासाठी बरेच प्रयत्न केले असतील तरी आपल्याकडील नोंद पुन्हा तपासून त्या विशिष्ठांची आस्था सुवार्तेमध्ये जागृत करण्यासाठी परत भेट घेण्याचा का प्रयत्न करू नये? कदाचित सायंकाळी घेतलेली भेट फलदायक ठरू शकेल.
४ या मे महिन्यात बऱ्याच बंधूभगिनींनी साहाय्यक पायनियरिंग करण्याचे ठरविले आहे. यात कौटुंबिक जबाबदाऱ्या तसेच पूर्ण वेळेची नोकरी करणारे बांधवही आहेत. यासाठी असणारी ६० तासांची गरज दिवसाला केवळ दोन तासांचे कार्य करून पूर्ण करता येईल.
५ कदाचित मे महिन्यात तुम्हाला साहाय्यक पायनियरिंग करण्याचे जमत नसेल तर पायनियर किंवा जे त्या महिन्यात आपले कार्य वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत अशांसोबत कार्य करून तुम्हाला आपले क्षेत्रकार्य वाढवता येणे शक्य आहे. यहोवा तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल याची तुम्ही खात्री बाळगू शकता. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तो तुम्हाला त्याच्या आत्म्याकरवी बळ पुरवील.—नीती. २०:१८; २१:५अ.