वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w19 डिसेंबर पृ. १५
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • एदेन बागेत जीवन कसं होतं?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मृत्यूनंतर जीवन—लोकांचा काय विश्‍वास आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • जीवाकरता एक चांगली आशा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • लबाडीबद्दलची सत्यता
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
w19 डिसेंबर पृ. १५

वाचकांचे प्रश्‍न

सैतानाने हव्वाला म्हटलं की तिने बऱ्‍यावाइटाचं ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचं फळ खाल्लं तर ती मरणार नाही. असं सांगण्याद्वारे तो तिला आज सर्वसामान्य असलेल्या अमर आत्म्याच्या शिकवणीबद्दल सांगत होता का?

सैतान एका सर्पाच्या माध्यमाने बोलून हव्वाला भुलवतो

नक्कीच नाही. हव्वाने मनाई केलेल्या झाडाचं फळ खाल्लं तर तिचं शरीर मरेल, पण तिच्यातला अदृश्‍य भाग मात्र (ज्याला लोक आज अमर आत्मा म्हणतात) कुठेतरी जिवंत राहील असं सैतानाने हव्वाला सांगितलं नाही. सैतानाने सापाच्या माध्यमाने असा दावा केला की हव्वाने त्या झाडाचं फळ खाल्लं तर ती “खरोखर मरणार नाही.” त्याने असं भासवलं की तिला कधीही मरण येणार नाही, ती पृथ्वीवर एका चांगल्या जीवनाचा आनंद घेऊ शकेल आणि तिला देवावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.—उत्प. २:१७; ३:३-५.

आज शिकवल्या जाणाऱ्‍या अमर आत्म्याच्या शिकवणीचा उगम जर एदेन बागेत झाला नाही तर मग कधी झाला? हे आपण खातरीने सांगू शकत नाही. नोहाच्या दिवसांत आलेल्या जलप्रलयानंतर सर्व प्रकारच्या खोट्या उपासनेचा अंत झाला हे आपल्याला माहीत आहे. जलप्रलयानंतर फक्‍त नोहा आणि त्याचं कुटुंबच वाचलं आणि ते देवाचे खरे उपासक होते. त्यामुळे जलप्रलयानंतर खोट्या शिकवणी शिकवणारं कोणीही उरलं नव्हतं.

तर मग आज शिकवल्या जाणाऱ्‍या अमर आत्म्याच्या शिकवणीचा उगम नक्कीच जलप्रलयाच्या काही काळानंतर झाला असेल. देवाने बाबेलमध्ये लोकांच्या भाषेत गोंधळ निर्माण केल्यामुळे सर्व लोक “पृथ्वीच्या पाठीवर” पसरले आणि यात काहीच शंका नाही की ते जिथे कुठे गेले तिथे अमर आत्म्याची शिकवण पसरत गेली. (उत्प. ११:८, ९) अमर आत्म्याच्या शिकवणीचा उगम कधीही झाला असो, आपल्याला हे माहीत आहे की “खोटेपणाचा बाप” म्हणजेच दियाबल सैतान याच्यामुळे या खोट्या शिकवणीचा उगम झाला. आणि ती शिकवण जास्तीत जास्त पसरल्यामुळे त्याला नक्कीच आनंद झाला असेल!—योहा. ८:४४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा