अनुक्रमणिका
३ ते स्वेच्छेनं पुढे आले—म्यानमारमध्ये
३-९ सप्टेंबर २०१८ चा आठवडा
७ तुम्हाला कोणाची स्वीकृती मिळवायची आहे?
आज बऱ्याच लोकांना या दुष्ट जगाकडून स्वीकृती मिळवण्याची इच्छा आहे. या लेखात चर्चा करण्यात आली आहे की सर्वोत्तम स्वीकृती यहोवाकडून मिळते आणि आपण आपलं लक्ष नेहमी या स्वीकृतीकडे कसं केंद्रित करू शकतो. त्यासोबतच आपण हेही पाहणार आहोत की कधीकधी यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना त्यांनी अपेक्षाही केली नाही अशा प्रकारे स्वीकृती देतो.
१०-१६ सप्टेंबर २०१८ चा आठवडा
१२ तुमचं लक्ष कोणावर केंद्रित आहे?
या लेखात आपण पाहणार आहोत की विश्वासू सेवक मोशे याच्या हातून पाप का घडलं आणि त्याने वचनयुक्त देशात जाण्याची संधी कशी गमावली. तसंच, आपण हेही शिकू की अशी चूक करण्याचं आपण कसं टाळू शकतो.
१७-२३ सप्टेंबर २०१८ चा आठवडा
२४-३० सप्टेंबर २०१८ चा आठवडा
सर्व मानव यहोवाचे आहेत यामुळे आपण त्याला एकनिष्ठ असलं पाहिजे. काही लोक देवाची उपासना करण्याचा दावा करतात पण ते त्याची आज्ञा पाळत नाहीत. पहिल्या लेखात आपण बायबलमधल्या काइन, शलमोन, मोशे आणि अहरोन यांच्या अहवालावरून महत्त्वाचे धडे शिकू. तर दुसऱ्या लेखात, आपण पाहू की आपण यहोवाचे लोक आहोत आणि याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे कोणकोणते मार्ग आहेत.
२७ “सर्व प्रकारच्या” लोकांबद्दल करुणा विकसित करा