अनुक्रमणिका
३० एप्रिल २०१८-६ मे २०१८ चा आठवडा
३ बाप्तिस्मा—ख्रिश्चनांसाठी आवश्यक
७-१३ मे २०१८ चा आठवडा
८ बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना मदत करत आहात का?
बायबल विद्यार्थ्याला शिकवताना आपलं काय ध्येय असलं पाहिजे? बाप्तिस्मा घेण्यासाठी उशीर करणं का चुकीचं आहे? काही पालकांनी कोणत्या कारणांमुळे आपल्या मुलांना कमी वयात बाप्तिस्मा घेण्यापासून रोखलं आहे? या आणि इतर प्रश्नांची उत्तरं, या दोन लेखात देण्यात आली आहेत.
१४-२० मे २०१८ चा आठवडा
प्रेषित पेत्रने पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना प्रोत्साहन दिलं: “कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा.” (१ पेत्र ४:९) या सल्ल्याचं पालन करणं आज इतकं महत्त्वाचं का आहे? आपण कोणकोणत्या मार्गांनी पाहुणचार करू शकतो? आपण चांगले पाहुणे कसे बनू शकतो? या लेखात या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.
१९ जीवन कथा—यहोवाने मला कधीच निराश केलं नाही!
२१-२७ मे २०१८ चा आठवडा
२३ शिस्त—देवाच्या प्रेमाचा पुरावा
२८ मे २०१८-३ जून २०१८ चा आठवडा
२८ शिस्त स्वीकार आणि सुज्ञपणे वाग
यहोवा लावत असलेली शिस्त ही त्याच्या प्रेमाचा एक पुरावा आहे, हे आपल्याला या दोन लेखांतून समजण्यासाठी मदत होईल. पण देव आपल्याला शिस्त कशी लावतो? आपण त्याला कसा प्रतिसाद दिला पाहिजे? आपण स्वतःला शिस्त कशी लावू शकतो? या प्रश्नांच्या उत्तरांवर या लेखांत चर्चा करण्यात आली आहेत.