अनुक्रमणिका
३ सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेने पुढे आले—मादागास्करमध्ये
२६ फेब्रुवारी २०१८-४ मार्च २०१८ चा आठवडा
आपण जीवनाच्या दबावांखाली दबून जातो तेव्हा आपण काय करू शकतो? या लेखात २०१८ च्या वार्षिक वचनावर चर्चा करण्यात आली आहे. आपल्याला मजबूत करण्याची संधी आपण यहोवाला का द्यावी आणि तो आपल्याला शक्ती कशी देईल याबद्दल या लेखात सांगितलं आहे.
५-११ मार्च २०१८ चा आठवडा
या वर्षी येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी शनिवार, ३१ मार्च २०१८ रोजी असणार आहे. या समारंभासाठी आपण आतापासून तयारी कशी करू शकतो? तिथे उपस्थित राहिल्याने आपल्याला कसा फायदा होईल? जगभरात देवाच्या लोकांना एकतेत राहण्यासाठी स्मारकविधीमुळे कशी मदत होते? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या लेखात मिळतील.
१२-१८ मार्च २०१८ चा आठवडा
१७ सर्वकाही देणाऱ्याला आपण काय द्यावं?
आपल्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला यहोवाकडून मिळालेली आहे. असं असलं तरी आपण त्याच्या संघटनेच्या कार्याला आर्थिक रीत्या हातभार लावावा, अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. आपल्या मौल्यवान गोष्टींनी आपण देवाला आदर कसा देऊ शकतो आणि याचा आपल्याला कसा फायदा होईल, याची चर्चा लेखात करण्यात आली आहे.
१९-२५ मार्च २०१८ चा आठवडा
२२ कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो?
२६ मार्च २०१८-१ एप्रिल २०१८ चा आठवडा
“शेवटच्या दिवसांत” सर्वसामान्यपणे आपल्याला स्वार्थीपणाच्या भावनेमुळे लोक स्वतःवर प्रेम करताना दिसतात. पण आपण स्वतःवर नाही तर देवावर प्रेम केल्यामुळे आपल्याला खरा आनंद कसा मिळतो हे पहिल्या लेखातून आपल्याला समजतं. (२ तीम. ३:१) दुसरा लेख आपल्याला हे समजण्यासाठी मदत करतो की देवाचे लोक जगातल्या बहुतेक लोकांपेक्षा कसे वेगळे आहेत.