प्रस्तावना
देवाला तुमची काळजी आहे का?
जेव्हा विपत्ती येते किंवा खूप त्रास सहन करून लोकांचा मृत्यू होतो तेव्हा आपल्या मनात असे प्रश्नं येऊ शकतात: “देवाचं या दुःखांकडे लक्ष आहे का?” किंवा “देवाला आपली काळजी आहे का?” बायबल सांगतं:
“कारण यहोवाचे डोळे नीतिमानांकडे लागलेले असतात आणि तो त्यांच्या याचनेकडे कान लावतो, पण वाईट गोष्टी करणाऱ्याकडे यहोवा पाठ फिरवतो.”—१ पेत्र ३:१२.
टेहळणी बुरूज चा हा अंक आपल्याला हे समजायला मदत करेल की देव आपली मदत कशी करत आहे आणि लवकरच तो सर्व दुःख काढून टाकण्यासाठी काय करणार आहे.