प्रस्तावना
कसं असेल आपलं भविष्य?
तुमचं आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं भविष्य कसं असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बायबल म्हणतं:
“नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९.
टेहळणी बुरूज याचा हा अंक आपल्याला हे समजायला मदत करेल की मानवजातीसाठी व पृथ्वीसाठी देवाचा एक सुंदर उद्देश आहे. तसंच, त्यापासून आपल्याला फायदा व्हावा म्हणून आपण काय करण्याची गरज आहे हेही समजायला मदत करेल.