अनुक्रमणिका
२९ मे २०१७–४ जून २०१७ चा आठवडा
तुम्ही यहोवाला कोणकोणती वचने दिली आहेत? दिलेली ही वचनं तुम्ही पाळत आहात का? तुम्ही दिलेल्या समर्पणाच्या वचनाबद्दल किंवा विवाहाच्या शपथांबद्दल काय? या लेखात आपण इफ्ताह आणि हन्ना यांनी, दिलेलं वचन पाळण्याबाबत जे उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आहे त्यावर चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपल्यालाही देवाला दिलेलं आपलं वचन पाळण्यास मदत होईल.
५-११ जून २०१७ चा आठवडा
९ देवाचं राज्य या पृथ्वीवर येईल, तेव्हा कोणत्या गोष्टी नाहीशा होतील?
नवीन जगात यहोवा देव आपल्याला कोणकोणते आशीर्वाद देईल याबद्दल आपण नेहमीच विचार करतो. पण या लेखात आपण पाहणार आहोत, की या जगात शांती आणि आनंद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी यहोवा देव कोणत्या चार वाईट गोष्टींना काढून टाकेल. या लेखामुळे आपल्याला आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आणि नवीन जग येईपर्यंत धीरानं सहन करण्यासाठी मदत मिळेल.
१४ जीवन कथा—ख्रिस्ताचा सैनिक बनून राहण्याचा दृढ निश्चय असलेला
१२-१८ जून २०१७ चा आठवडा
१८ “सर्व जगाचा न्यायाधीश” नेहमी योग्य न्याय करतो
१९-२५ जून २०१७ चा आठवडा
२३ न्यायाबद्दल तुमचाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे का?
जेव्हा आपल्यावर अन्याय होतो किंवा मंडळीत दुसऱ्या एखाद्यावर अन्याय होताना आपण पाहतो, तेव्हा आपल्या विश्वासाची, नम्रतेची आणि एकनिष्ठतेची परीक्षा होऊ शकते. या दोन लेखांमध्ये आपण अशा तीन बायबल अहवालांबद्दल पाहणार आहोत, ज्यांवर विचार केल्याने आपल्याला न्यायाबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगण्यास मदत होईल.
२६ जून २०१७–२ जुलै २०१७ चा आठवडा
२८ तुमच्या स्वेच्छेने पुढे येण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो!
खरंतर यहोवाला आपल्याकडून कोणत्याही गोष्टीची गरज नाही. पण जेव्हा आपण त्याच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी मेहनत घेतो, तेव्हा त्याला आनंद होतो. आपण शास्ते अध्याय ४ आणि ५ मधून शिकणार आहोत, की स्वेच्छेने पुढे येण्याच्या आपल्या मनोवृत्तीची आणि त्याच्या आज्ञा पाळण्याच्या आपल्या इच्छेची तो कदर करतो.