प्रस्तावना
तुम्हाला काय वाटतं?
विश्वात सर्वात चांगली भेट देणारा कोण आहे?
“प्रत्येक उत्तम देणगी व परिपूर्ण दान वरून, म्हणजे स्वर्गीय प्रकाशाच्या पित्याकडून येते, जो बदलत जाणाऱ्या सावल्यांप्रमाणे कधीही बदलत नाही.”—याकोब १:१७.
देवाने सगळ्यांसाठी सर्वात चांगली अशी एक भेट दिली आहे. टेहळणी बुरूज च्या या अंकामुळे त्या भेटीची कदर बाळगण्यासाठी आपल्याला मदत होईल.