वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 नोव्हेंबर पृ. १९-२०
  • हे काम मोठं आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हे काम मोठं आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • स्वेच्छेने पुढे येणाऱ्‍यांना यहोवा विपुल आशीर्वाद देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 नोव्हेंबर पृ. १९-२०
दावीद राजा मंदिर बनवण्यासाठी तयार केलेला नमुना एका व्यक्‍तीला दाखवताना; एक बांधव बांधकामाचा नमुना पाहताना

हे काम मोठं आहे

यरुशलेममध्ये एका खूप महत्त्वाच्या सभेची वेळ झाली आहे. दाविदाने इस्राएलमधील आपल्या सर्व राजपुत्रांना, सरदारांना आणि शूरवीरांना एकत्र बोलवलं आहे. दावीद आज एक खास घोषणा करणार आहे. ती घोषणा ऐकून सगळ्यांना फार आनंद होतो. यहोवाने दाविदाच्या मुलावर, शलमोनावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी म्हणजे यहोवाची उपासना करण्यासाठी त्याला समर्पित असलेलं एक विशाल भवन बांधण्याची. हे भवन कसं बनवावं याचा नमुना दाविदाने देवाच्या प्रेरणेनं तयार केला आहे आणि हा नमुना तो शलमोनाला देतो. मग दावीद म्हणतो: “काम तर मोठे आहे; कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर परमेश्‍वर देवासाठी आहे.”—१ इति. २८:१, २, ६, ११, १२; २९:१.

मग दावीद लोकांना एक प्रश्‍न विचारतो: “परमेश्‍वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यास कोण तयार आहे?” (१ इति. २९:५) समजा तुम्ही त्या ठिकाणी असता तर दाविदाने केलेल्या आर्जवाला तुम्ही कसा प्रतिसाद दिला असता? या भव्य कामात हातभार लावण्यासाठी तुम्ही पुढे आला असता का? इस्राएली लोकांनी अगदी हेच केलं. या कामात त्यांनी स्वतःला आनंदाने झोकून दिलं. बायबल सांगतं, “त्यांनी प्रसन्‍न होऊन खऱ्‍या मनाने व स्वेच्छेने परमेश्‍वराप्रीत्यर्थ . . . अर्पणे केली.”—१ इति. २९:९.

अनेक शतकांनंतर यहोवा देवाने या मंदिरापेक्षाही मोठ्या अशा एका गोष्टीची स्थापना केली. त्याने एका मोठ्या आध्यात्मिक मंदिराची स्थापना केली. ही एक अशी तरतूद आहे, ज्यामुळे मानव येशूच्या बलिदानाच्या आधारावर यहोवाची खरी उपासना करून त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडू शकतात. (इब्री ९:११, १२) मग आज यहोवा देव कोणत्या मार्गाने लोकांना त्याच्यासोबत समेट करण्यास मदत करत आहे? जगभरात शिष्य बनवण्याचं जे कार्य आज चालू आहे त्याद्वारे तो हे करत आहे. (मत्त. २८:१९, २०) त्याचा परिणाम म्हणजे, दरवर्षी लाखो लोक बायबल अभ्यास घेत आहेत, हजारो लोकांचा बाप्तिस्मा होत आहे आणि शेकडो नवीन मंडळ्या स्थापन होत आहेत.

पण, झपाट्याने होणाऱ्‍या या वाढीमुळे आपल्याला जास्तीतजास्त बायबल प्रकाशनांची, राज्य सभागृह बांधून त्यांची देखरेख करण्याची, आणि संमेलनं व अधिवेशनांसाठी मोठमोठ्या सभागृहांचा वापर करण्याची गरज पडते. या गोष्टींवरून हेच दिसून येतं, की सुवार्ता घोषित करण्याचं काम हे खूप भव्य आणि प्रतिफलदायी आहे. तुम्हालाही असंच वाटत नाही का?—मत्त. २४:१४.

यहोवा देवावर आणि शेजाऱ्‍यांवर असलेल्या प्रेमामुळे, तसंच राज्य प्रचाराचं काम किती निकडीचं आहे याची जाणीव असल्यामुळे, देवाचे सेवक स्वतःला “स्वेच्छेने वाहून घेण्यास” प्रेरित होतात; ते हे स्वखुशीनं अनुदान देण्याद्वारे करतात. “आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्‍नाच्या प्रथम फळाने परमेश्‍वराचा सन्मान” करणं, हा खरंच किती मोठा विशेषाधिकार आहे! आणि जेव्हा आपण पाहतो की राज्याच्या कामासाठी या अनुदानाचा प्रामाणिकपणे व योग्य प्रकारे वापर केला जात आहे, तेव्हाही आपल्याला खूप आनंद होतो. राज्याचं हे कार्य मानवी इतिहासातील आजवर होत असलेलं असं एक भव्य कार्य आहे, जे पुन्हा कधीही केलं जाणार नाही!—नीति. ३:९.

जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान देण्याचे काही मार्ग

आज बरेच जण ठरावीक रक्कम बाजूला ठेवतात आणि “जगभरात चाललेल्या कार्यासाठी” असं लिहिलेल्या मंडळीच्या दानपेटीत ती टाकतात. (१ करिंथ. १६:२) दर महिन्याला मंडळ्या हे दान संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. तसंच, तुमच्या देशात यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या कायदेशीर निगमाला तुम्ही थेट आपलं दान पाठवू शकता.a तुम्ही कोणकोणत्या प्रकारे थेट अनुदान पाठवू शकता ते पुढे सांगितलं आहे:

देणग्या

  • इलेक्ट्रॉनिक बँक ट्रान्सफरद्वारे दान.b

  • पैसे, दागदागिने किंवा इतर मौल्यवान वैयक्‍तिक मालमत्ता देणगी म्हणून दिली जाऊ शकते. पैसे किंवा मालमत्ता ही देणगी आहे, असं सूचित करणारं एक पत्र सोबत पाठवा.

धर्मादाय योजनाc

पैशांची देणगी आणि मौल्यवान वैयक्‍तिक मालमत्ता दान म्हणून देण्याव्यतिरिक्‍त, जगभरात चाललेल्या राज्य सेवेच्या फायद्याकरता दान देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते खाली दिलेले आहेत. तुम्हाला एखाद्या मार्गाने किंवा अनेक मार्गांनी दान देण्याची इच्छा असली, तरीसुद्धा प्रथम तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या शाखा कार्यालयाशी संपर्क साधून तुमच्या देशात कोणते मार्ग उपलब्ध आहेत याची खात्री करून घ्या. प्रत्येक देशातील कायदे आणि कराच्या बाबत असलेले नियम वेगवेगळे असल्यामुळे दान करण्याचा सर्वात उत्तम मार्ग निवडण्याअगोदर करांविषयी व कायदेशीर बाबींविषयी योग्य सल्लागारांचं मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे.

विमा: यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला, जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवलं जाऊ शकतं.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार ट्रस्ट स्थापन करून किंवा मग मृत्यूनंतर ते यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला देय केलं जाऊ शकतं.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌सदेखील यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला थेट दान केले जाऊ शकतात किंवा मृत्यूनंतर हस्तांतर करण्यासंबंधी लेखी करार केला जाऊ शकतो.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करून, जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करू शकता किंवा या निगमाला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. या व्यवस्थेअंतर्गत करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात.

“धर्मादाय योजना” या शब्दांवरून सूचित होतं त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानाकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड हे माहितीपत्रक तयार करण्यात आलं आहे.d एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, या बाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आलं आहे. तुमच्या देशातील ‘कर’ संबंधीचे किंवा इतर कायदे वेगळे असल्यामुळे या माहितीपत्रकातील सूचना तुमच्या परिस्थितीला कदाचित पूर्णपणे लागू होणार नाहीत. तेव्हा, हे माहितीपत्रक वाचल्यानंतर स्वतःच्या कर किंवा कायदा सल्लागारांशी चर्चा करा. दान देण्यासाठी या वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग केल्यामुळे अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असं केल्यानं मिळणाऱ्‍या कर सवलतीदेखील वाढवता आल्या आहेत. तुमच्या देशात हे माहितीपत्रक उपलब्ध असल्यास स्थानिक मंडळीच्या सचिवाला विनंती करून त्याची एक प्रत मागवली जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी तुम्ही jw.org या आमच्या वेबसाईटवर जाऊन “Make a Donation to Our Worldwide Work” यावर क्लिक करू शकता, किंवा आमच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

a भारतात हे “जेहोवाज विट्‌नेसेस ऑफ इंडिया”ला देय असावे.

b भारतीय पासपोर्ट धारक www.jwindiagift.org या वेबसाईटचा उपयोग करू शकतात.

c अंतिम निर्णय घेण्याआधी स्थानिक शाखा कार्यालयाशी याबद्दल खात्री करून घ्या.

d भारतात, “तुमच्या मौल्यवान वस्तूंनी यहोवाचा सन्मान करा” नावाची पत्रिका इंग्रजी, कन्‍नड, तमिळ, तेलगू, मल्याळम व हिंदी या भाषांत उपलब्ध आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा