वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 १/१ पृ. ६
  • देव सांगतो ते तुम्ही करता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव सांगतो ते तुम्ही करता का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही यहोवाशी मैत्री करू शकता!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • “देवाजवळ या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुम्ही यहोवाबद्दल का शिकत राहिलं पाहिजे?
    देवाकडून आनंदाची बातमी!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 १/१ पृ. ६
एक मनुष्य एका स्त्रीला मदत करत आहे

मुख्य विषय | तुम्ही देवाचे मित्र बनू शकता

देव सांगतो ते तुम्ही करता का?

“तू बोलून तर बघ, तुझ्यासाठी मी कायपण करीन.” एखाद्या अनोळखी किंवा तोंडओळख असलेल्या व्यक्‍तीला तुम्ही नक्कीच असे म्हणणार नाही. पण, एका प्रिय मित्राला असे बोलण्यास तुम्हाला काहीच वाटणार नाही. कारण जिवलग मित्र सहसा एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात.

बायबल म्हणते, की आपल्या उपासकांना कोणत्या गोष्टींतून आनंद मिळतो हे यहोवाला माहीत असते आणि त्या गोष्टी तो वेळोवेळी त्यांना पुरवतो. उदाहरणार्थ, यहोवासोबत घनिष्ठ मैत्री असलेल्या दावीद राजाने म्हटले: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; . . . मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.” (स्तोत्र ४०:५) इतकेच काय, जे यहोवाला ओळखत नाहीत अशांसाठीसुद्धा तो चांगल्या गोष्टी करतो. तो “अन्‍नाने व हर्षाने” त्यांची मने “भरून तृप्त” करतो.—प्रेषितांची कृत्ये १४:१७.

आपण ज्यांच्यावर प्रेम करतो व ज्यांचा आदर करतो अशांसाठी आपण काहीही करायला तयार असतो

यहोवा जर इतरांसाठी आनंदाने चांगल्या गोष्टी करतो तर ज्यांना त्याचे मित्र बनायची इच्छा आहे त्यांनीसुद्धा त्याच्यासाठी अशा गोष्टी करू नयेत का, की ज्यांमुळे त्याचे “मन आनंदित” होईल? (नीतिसूत्रे २७:११) पण देवाचे मन आनंदित करण्यासाठी आपण नेमके काय करू शकतो? याचे उत्तर बायबल देते: “इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.” (इब्री लोकांस १३:१६, ईझी-टू-रीड व्हर्शन) याचा अर्थ, यहोवाला संतुष्ट करण्याकरता इतरांसाठी चांगल्या गोष्टी करणे व दानधर्म करणे पुरेसे आहे असा होतो का?

“विश्‍वासावाचून त्याला ‘संतोषविणे’ अशक्य आहे,” असे बायबल म्हणते. (इब्री लोकांस ११:६) लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे, की “अब्राहामाने देवावर विश्‍वास ठेवला” त्यानंतर “त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले.” (याकोब २:२३) देवाकडून मिळणारे आशीर्वाद अनुभवण्यासाठी त्याच्यावर “विश्‍वास” ठेवणे गरजेचे आहे यावर येशूनेसुद्धा भर दिला. (योहान १४:१) होय, देवाने आपल्याला त्याचे मित्र मानावे म्हणून त्याच्यावर विश्‍वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग, आपण हा विश्‍वास कसा मिळवू शकतो? त्यासाठी आपण देवाचे वचन, बायबल याचा नियमितपणे अभ्यास करण्यापासून सुरुवात करू शकतो. असे केल्यामुळे देवाच्या “इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने” आपण भरून जाऊ आणि त्याला ‘संतुष्ट’ कसे करायचे हे आपण शिकू. जसजसे यहोवाबद्दलचे आपले ज्ञान वाढेल व त्याच्या नीतिमान अपेक्षांनुसार आपण जीवन जगू तसतसा आपला विश्‍वास वाढत जाईल आणि यहोवा आपल्या आणखी जवळ येईल.—कलस्सैकर १:९, १०. (w14-E 12/01)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा