वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ११/१५ पृ. ८-९
  • इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • हे काम मोठं आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • स्वेच्छेने पुढे येणाऱ्‍यांना यहोवा विपुल आशीर्वाद देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ११/१५ पृ. ८-९

इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार?

एका विकसनशील देशात राहणारे वडील, बंधू फ्रान्स्‌वा यांनी असे म्हटले: “निवडणुकीनंतर अचानक सुरू झालेल्या हिंसाचारामुळं हजारो यहोवाच्या साक्षीदारांना नाइलाजानं आपली घरं सोडून पळून जावं लागलं.” ते पुढे म्हणतात: “अन्‍न आणि औषधं यांसारख्या गोष्टी अपुऱ्‍या पडू लागल्या, आणि इतर गोष्टींच्या किंमती खूप जास्त वाढल्या. बँका बंद पडल्या आणि पैसे काढण्याची यंत्रं निकामी झाली.”

या हिंसाचारामुळे ज्या बंधुभगिनींनी आपले घरदार सोडले होते ते राज्य सभागृहांत एकत्र आले. शाखा कार्यालयातील बांधवांनी या बंधुभगिनींना पैसे व जीवनावश्‍यक वस्तू पाठवण्याची लगेच व्यवस्था केली. रस्त्यावर ठिकठिकाणी अडथळे लावण्यात आले होते, पण निवडणुकीत उभे राहिलेल्या दोन्ही बाजूच्या लोकांना माहीत होते की यहोवाचे साक्षीदार राजकारणात भाग घेत नाहीत. म्हणून शाखा कार्यालयातून येणाऱ्‍या गाड्यांना ते सहसा जाऊ द्यायचे.

फ्रान्स्‌वा सांगतात: “एका राज्य सभागृहाला जाताना आमच्या व्हॅनवर गोळ्या झाडण्यात आल्या. पण आम्ही थोडक्यात बचावलो. एका सैनिकाला बंदूक घेऊन आमच्या दिशेनं पळत येत असल्याचं पाहून आम्ही लगेच गाडी मागं वळवली आणि भरधाव वेगानं शाखा कार्यालयाकडे निघालो. आम्ही जिवंत होतो त्याबद्दल यहोवाचे आभार मानले. दुसऱ्‍या दिवशी, त्या राज्य सभागृहातील १३० बंधुभगिनी सुखरूप ठिकाणी पोहचले. काही बंधुभगिनी शाखा कार्यालयात आले. जोपर्यंत हिंसाचार सुरू होता तोपर्यंत आम्ही या बंधुभगिनींचा आध्यात्मिक आणि शारीरिक रीत्या सांभाळ केला.”

फ्रान्स्‌वा असे म्हणतात: “काही काळानंतर शाखा कार्यालयाला सबंध देशातील बंधुभगिनींकडून बरीच पत्रं मिळाली ज्यात त्यांनी मनापासून आभार मानले होते. दुसऱ्‍या ठिकाणी असलेले आपले बांधव मदतीला धावून आल्याचे पाहून यहोवावरील त्यांचा भरवसा आणखी दृढ झाला.”

नैसर्गिक विपत्ती किंवा मानवनिर्मित संकटे येतात तेव्हा आपण आपल्या गरजू बंधुभगिनींना “ऊब घ्या व तृप्त व्हा” असे म्हणत नाही. (याको. २:१५, १६) तर आपण त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या शतकात दुष्काळ पडणार असल्याचा इशारा देण्यात आला तेव्हा शिष्यांनी “निश्‍चय केला की, यहूदीयात राहणाऱ्‍या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्‍ती काही पाठवावे.”—प्रे. कृत्ये ११:२८-३०.

यहोवाचे साक्षीदार या नात्याने गरजू लोकांना भौतिक रीत्या मदत करण्याची आपली इच्छा आहे. पण लोकांना आध्यात्मिक मदतीचीसुद्धा गरज आहे. (मत्त. ४:४) लोकांना त्यांच्या आध्यात्मिक गरजेबद्दल जाणीव व्हावी आणि ही गरज पूर्ण करता यावी म्हणून येशूने त्याच्या अनुयायांवर शिष्य बनवण्याचे काम सोपवले. (मत्त. २८:१९, २०) ही कामगिरी पूर्ण करता यावी म्हणून आपण आपला वेळ, आपली शक्‍ती व साधनसंपत्ती खर्च करतो. एक संघटना या नात्याने आपण काही प्रमाणात भौतिक रीत्या मदत पुरवतो; पण संघटनेला मिळणारे अनुदान प्रामुख्याने राज्याशी संबंधित कार्यांसाठी आणि सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी वापरले जाते. अशा प्रकारे आपण देवाप्रती व शेजाऱ्‍यांप्रती आपले प्रेम असल्याचे दाखवतो.—मत्त. २२:३७-३९.

जे अनुदान देऊन यहोवाच्या साक्षीदारांच्या या कार्याला हातभार लावतात ते ही खात्री बाळगू शकतात की त्यांनी दिलेल्या अनुदानाचा योग्य आणि उत्तम रीत्या वापर केला जात आहे. तुम्ही गरजू बांधवांना मदत करू शकता का? शिष्य बनवण्याच्या कार्याला हातभार लावण्याची तुमची इच्छा आहे का? तर मग, इतरांचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुमच्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नका.—नीति. ३:२७.

जगभरात चाललेल्या कार्यासाठी काही जण कशा प्रकारे दान देतात

प्रेषित पौलाच्या दिवसांप्रमाणे, आजही बरेच जण ठराविक रक्कम बाजूला ठेवतात आणि “जगभरात चाललेल्या कार्यासाठी” असे लिहिलेल्या मंडळीच्या दानपेटीत ती टाकतात. (१ करिंथ. १६:२) दर महिन्याला मंडळ्या हे दान संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. तसेच, तुमच्या देशात यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या कायदेशीर निगमाला तुम्ही थेट आपले दान पाठवू शकता.a तुम्ही कोणकोणत्या प्रकारे थेट अनुदान पाठवू शकता ते पुढे सांगितले आहे:

  • देणग्या

    • पैसे, दागदागिने किंवा इतर मौल्यवान वैयक्‍तिक मालमत्ता देणगी म्हणून दिली जाऊ शकते.

    • पैसे किंवा मालमत्ता ही देणगी आहे हे सूचित करणारे एक पत्र सोबत पाठवा.

  • सशर्त-दान योजना

    • दात्याला गरज पडल्यास पैसे परत केले जातील या अटीवर पैशांचे दान दिले जाऊ शकते.

    • ही सशर्त देणगी आहे हे सूचित करणारे एक पत्र सोबत पाठवा.

  • धर्मादाय योजना b

    पैशांची देणगी आणि मौल्यवान वैयक्‍तिक मालमत्ता दान म्हणून देण्याव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता दान देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते खाली दिलेले आहेत. तुम्हाला कोणत्याही मार्गाने किंवा मार्गांनी दान देण्याची इच्छा असली, तरीसुद्धा प्रथम तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या शाखा कार्यालयाशी संपर्क साधून तुमच्या देशात कोणते मार्ग उपलब्ध आहेत याची खातरी करून घ्यावी. प्रत्येक देशातील कायदे आणि कराच्या बाबत असलेले नियम वेगवेगळे असल्यामुळे दान करण्याचा सर्वात उत्तम मार्ग निवडण्याअगोदर करांविषयी व कायदेशीर बाबींविषयी योग्य सल्लागारांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे.

    विमा: यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.

    बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार ट्रस्ट स्थापन करून किंवा मग मृत्यूनंतर ते यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला देय केले जाऊ शकते.

    स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌सदेखील यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाला थेट दान केले जाऊ शकतात किंवा मृत्यूनंतर हस्तांतर करण्यासंबंधी करार केला जाऊ शकतो.

    जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करून, जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो.

    दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात पैसे किंवा सुरक्षितता यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर केली जाते. या व्यवस्थेत, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्‍तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.

    इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या एखाद्या निगमाच्या नावावर करू शकता किंवा या निगमाला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. या व्यवस्थेअंतर्गत करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात.

“धर्मादाय योजना” या शब्दांवरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानाकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे.c एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, या बाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आले होते. तुमच्या देशातील करासंबंधीचे किंवा इतर कायदे वेगळे असल्यामुळे या माहितीपत्रकातील सूचना तुमच्या परिस्थितीला कदाचित पूर्णपणे लागू होणार नाहीत. तेव्हा, हे माहितीपत्रक वाचल्यानंतर स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांशी चर्चा करा. दान देण्यासाठी या वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग केल्यामुळे अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणाऱ्‍या कर सवलतीदेखील वाढवता आल्या आहेत. तुमच्या देशात हे माहितीपत्रक उपलब्ध असल्यास स्थानिक मंडळीच्या सचिवाला विनंती करून त्याची एक प्रत मागवली जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

[तळटीपा]

a भारतात हे “जेहोवाज विट्‌नेसेस ऑफ इंडिया”ला देय असावे.

b अंतिम निर्णय घेण्याआधी कृपया स्थानिक शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.

c भारतात, “तुमच्या मौल्यवान वस्तूंनी यहोवाचा सन्मान करा” नावाची पत्रिका इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, मल्याळम व हिंदी या भाषांत उपलब्ध आहे.

Jehovah’s Witnesses of India

Post Box ६४४०, Yelahanka

Bangalore ५६००६४

Karnataka, India

Telephone: ०९८४५४७६४२५ ०९८४५३४८८१५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा