वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w11 १२/१५ पृ. ३१
  • तुम्हाला माहीत होते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला माहीत होते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या घराच्या अंगणातील हिरवागार ऑलिव्ह
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • येशू मंदिर शुद्ध करतो
    बायबलमधून शिकू या!
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
w11 १२/१५ पृ. ३१

तुम्हाला माहीत होते का?

जेरूसलेमच्या मंदिरात पैशांची अदलाबदल करणारे सराफ का होते?

▪ येशूने आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी मंदिरात होणाऱ्‍या घोर अन्यायाविरुद्ध पाऊल उचलले. त्याबद्दल बायबल म्हणते: “मंदिरात जे क्रयविक्रय करीत होते त्या सर्वांना [येशूने] बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्‍यांच्या बैठकी पालथ्या केल्या, आणि त्यांस म्हटले, ‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहा.”—मत्त. २१:१२, १३.

पहिल्या शतकातील यहुदी आणि यहुदी मतानुसारी निरनिराळ्या देशांतून व शहरांतून जेरूसलेममधील मंदिरात यायचे तेव्हा ते आपापल्या भागांतील नाणी आपल्यासोबत आणायचे. पण, मंदिराचा वार्षिक कर भरण्यासाठी, यज्ञपशूंची खरेदी करण्यासाठी व इतर ऐच्छिक अर्पणे देण्यासाठी त्यांना एकाच स्वीकृत चलनाचा उपयोग करावा लागत असे. त्यामुळे, पैशांची अदलाबदल करणारे सराफ निरनिराळ्या भागांतील व निरनिराळ्या किंमतींची नाणी स्थानिक चलनात बदलायचे व या सेवेच्या बदल्यात ते लोकांकडून काही पैसे घ्यायचे. यहुदी सणांची वेळ जवळ यायची तेव्हा हे सराफ मंदिरातील विदेश्‍यांच्या अंगणात आपले चौरंग थाटून बसायचे.

पैशांची अदलाबदल करणारे हे सराफ मंदिराला “लुटारूंची गुहा” बनवत होते अशी जी टीका येशूने केली त्यावरून असे दिसते, की पैशांची अदलाबदल करण्यासाठी ते लोकांकडून भरमसाट पैसे उकळत होते. (w११-E १०/०१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा